शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
3
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
4
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
5
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
6
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
7
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
8
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
9
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
10
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
11
Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
12
ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'
13
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
14
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
15
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
17
Gautam Gambhir: गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया सुपर फ्लॉप; ११ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
18
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
19
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
20
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वीज तोडणी मोहीम हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश : हर्षवर्धन पाटलांचा हल्लाबोल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 13:59 IST

सध्या इंदापूर तालुक्याचे काठावरती पास झालेले राज्यमंत्री हे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत.

इंदापूर : यंदाच्या वर्षी शेतकरी बांधव कोरोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना राज्यातील ठाकरे सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवित आहे. शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम हे महाविकास आघाडी सरकार अपयश आहे, अशी टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली .

सध्या इंदापूर तालुक्याचे काठावरती पास झालेले राज्यमंत्री हे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत. मात्र सध्याच्या वीज तोडणी मोहिमे संदर्भात सध्या एक शब्दही बोलत नाही. कोरोना, अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज तोडणीमुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता महाआघाडी सरकारने तात्काळ  शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली.         शेतीसाठी वीजपुरवठा महत्त्वाचा असल्याने माझ्या मंत्रिपदाच्या काळात वीज उपकेंद्राची मोठ्या संख्येने निर्मिती केली.तसेच माझ्या काळातील एकदाही शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. मात्र आताच्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांवर वीज तोडीचे संकट टाकले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून चारा पिके, भाजीपाला पिके करपून चालली आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

.... इंदापूर तालुक्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे 

मी वीस वर्षे मंत्रिपदाच्या कार्यकाळात काय केले असे विचारणार्‍या राज्यमंत्र्यांनी त्यांच्या काळात तालुक्यातील एक तरी वीज उपकेंद्र उभे केले का? उलट मी राज्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केले आहे. त्यामुळे गेल्या २५ वर्षात शेतीला पुरेशा दाबाने व नियमितपणे वीजपुरवठा होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

..... 

बांधकाम राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात वाढते अपघात

गेल्या काही दिवसापासून बांधकाम राज्यमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांच्या कामासंदर्भात ठेकेदारांनी साईडपट्ट्या न भरणे आदी रस्ता सुरक्षिततेच्या संदर्भात योग्य उपाययोजना न केल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्याची गरज आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Indapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitin Rautनितीन राऊत