शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमाची सत्र परीक्षा पुढे ढकला : विद्यार्थ्यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 20:53 IST

अहमदनगर, नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी विधी अभ्यासक्रमास घेतला प्रवेश

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला निवेदनकाही महाविद्यालयात घाईघाईने पूर्ण केला अभ्यासक्रम येत्या ३० जानेवारीपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पहिली सत्र परीक्षा घेतली जाणार

पुणे : विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या सत्राचा अभ्यासक पूर्णपणे शिकवला गेला नाही. तर काही महाविद्यालयात घाईघाईने अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मात्र, येत्या ३० जानेवारीपासून सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे पहिली सत्र परीक्षा घेतली जाणार आहे. परंतु,अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारीच झाली नसल्याने विद्यापीठाने काही दिवस परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी-सेल) राज्यातील विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली. मात्र, प्रवेश प्रक्रियेला लांबल्यामुळे काही महाविद्यालयात ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात वर्ग सुरू झाले तर व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होती. त्यामुळे अनेक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना केवळ ३० ते ४० दिवसच वर्गात शिक्षकांकडून मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अहमदनगर, नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी विधी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमाच्याविद्यार्थ्यांना ९० दिवस मार्गदर्शन केल्या शिवाय त्यांची परीक्षा घेता येत नाही,या नियमानुसार ९० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आमची परीक्षा घावी, अशी मागणी विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यात १६ नाशिक जिल्ह्यात ५ तर अहमदनगर जिल्ह्यात ४ विधी महाविद्यालये आहेत. अर्धवट शिकवलेल्या अभ्यासक्रमासह सत्र परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड तणावात असून विद्यार्थ्यांना जेएमएफसी सारख्या प्रतिष्ठित परीक्षांची तयारी करायची आहे. अपूर्ण अभ्यासक्रमासह परीक्षेला सामोरे जाणे हा एक प्रकारे अन्यायच ठरेल. त्यामुळे विधी अभ्यासक्रमाची सत्र परीक्षा १५ ते २० दिवस पुढे ढकलावी, या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांतर्फे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांना दिले आहे.--सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व विधी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निश्चित केलेल्या कालावधीत योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमास नांदेड, बीड, उस्मानाबाद यांसारख्या जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.उशीरा मिळालेला प्रवेश, महाविद्यालयातील बुडालेला अभ्यासक्रम आणि चालू अभ्यासक्रम यांची सांगड घालताना विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने १५ ते २० दिवस परीक्षा पुढे ढकलावी या मागणीचे निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहे.- करण नाईकनवरे, विद्यार्थी, आयएलएस लॉ कॉलेज.........विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला दिलेले निवेदन अद्याप माझ्यापर्यंत आले नाही. नियमानुसार विद्यार्थ्यांना ९० दिवसांचा कार्यकाल मिळणे गरजेचे आहे. तसे झाले नसले तर परीक्षेच्या कालावधीत दुरूस्ती करता येईल.- डॉ. अरविंद शाळिग्राम, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीexamपरीक्षाuniversityविद्यापीठ