शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 00:34 IST

विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक जोरदार पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोवा व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़

पुणे - विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक जोरदार पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोवा व मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़ येत्या २४ तासांत उत्तर कोकण, गोव्यात व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ राज्यातील किनारपट्टीलगतचा अरबी समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़विदर्भात लाखांदूर १३०, अहिरी, भद्रावती १२०, कोपर्णा ११०, भंडारा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर ९०, बल्लाळपूर, गोंदिया, लाखानी, मुलदेरा, नागभिड ८०, अर्जुनी मोरगाव, चिमूर, देवरी, देसाईगंज, मूल, शिंदेवाही, तुमसर, उमरेड, वरोरा ७०, भिवपूर, धानोरा, गडचिरोली, जिवती, पौनी, साकोली, साली, सिरोंचा, यवतमाळ ६० मिमी पाऊस झाला असून, या शिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे़घाटमाथ्यावरील ताम्हिणी १५०, दावडी, भिरा ९०, लोणावळा ८०, कोयना, वळवण ५० मिमी पाऊस झाला होता़ सध्या मॉन्सून ओडिशा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, आंध्र प्रदेश किनारपट्टी, तेलंगणा व कर्नाटकामध्ये सक्रिय आहे़ पुढील तीन दिवस प्रामुख्याने उत्तर कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ १७ आॅगस्ट रोजी उत्तर कोकण, गोवा व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे़ १८ आॅगस्ट रोजी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे़गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जळगावात ११६ मिमी पावसाची नोंद झाली असून, महाबळेश्वर ७३, मालेगाव २२, उस्मानाबाद ५८, औरंगाबाद ६६, परभणी ५१, अकोला १४, अमरावती ३४, ब्रह्मपुरी ९६, चंद्रपूर २३, यवतमाळ २४, डहाणू, पणजी ७, सोलापूर ७, मुंबई ३, सांताक्रूझ ६, रत्नागिरी ८, लोहगाव, पुणे ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र