शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक! पुण्यात गणेशोत्सवात आगीची एकही घटना नाही; साधेपणाने उत्सव साजरा केल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 11:38 IST

दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकेप्रमाणे अग्निशामक दलाकडूनही ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते..

ठळक मुद्देयंदाच्या उत्सवात गणेश मंडपांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना आल्या आहेत शून्यावर

पुणे : कोरोनामुळे यंदा सर्वच सण आणि उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. ना कोठे मंडप ना देखावे, ना आकर्षक सजावटी. याचा परिणाम अर्थकारणावर झाला असला तरी सकारात्मक परिणामही पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत आगीची एकही घटना गणेश मंडळांजवळ घडलेली नसल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली.

दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे अग्निशामक दलाकडूनही ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. मंडळांना त्यांच्या मंडपांमध्ये अग्निप्रतिबंधक  व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मंडळांकडून मोठमोठे देखावे सादर केले जातात. यासोबतच विद्यूत रोषणाईही मोठ्या केली जाते. गणेशोत्सवामध्ये ज्वलनशील पदार्थ, शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. यामुळे अनेकदा अग्निशामक दलाला गर्दीमुळे वेळेत पोचणे शक्य होत नाही. अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशामक दलाचे वाहन आतमध्ये जाऊ शकत नाही. रस्त्यावर देखावे पाहण्यासाठी नागरिक बाहेर पडलेले असताना अग्निशामक दलाच्या जवानांना कसरत करावी लागते.

यंदा मात्र या कसरतीमधून दलाच्या जवानांची सुटका झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांनी शासकीय यंत्रणांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेत तो अमलातही आणला आहे. बहुतांश गणेश मंडळांनी मंदिरातच किंवा मंदिराला लागूनच उभारलेल्या छोट्या मंडपांमध्ये गणपती प्रतिष्ठापित केले आहेत. यंदा देखावेही सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे फारशी सजावट व विद्यूत रोषणाई देखील करण्यात आलेली नाही. या सर्व साधेपणाने यंदाच्या उत्सवात गणेश मंडपांमध्ये लागणा-या आगीच्या घटना शून्यावर आल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfireआगGanesh Mahotsavगणेशोत्सवfire brigade puneपुणे अग्निशामक दल