शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

Porsche Car Accident : रक्त नमुन्यातील बनवाबनवीमुळेच आई-बाप आजही तुरुंगात

By नितीश गोवंडे | Updated: January 30, 2025 13:53 IST

पोर्शे कार अपघातानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उलगडला घटनाक्रम

- नितीश गोवंडेपुणे : मे २०२४ मध्ये मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक-युवतीचा मृत्यू झाला. या अपघाताची चर्चा देशभर झाली. पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले गेले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मात्र, हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. १९ मे २०२४ रोजी घडलेल्या अपघातानंतर अल्पवयीन मुलाचा बाप, आई, आजोबा, डॉक्टर, ससूनचा शिपाई, बार चालक अशा सगळ्यांना अटक करण्यात आली होती. आज या घटनेच्या आठ महिन्यांनंतरही हे दोषी येरवडा कारागृहात असून, पोलिसांनी सिद्ध केलेल्या रक्त नमुन्यातील बनवाबनवीमुळेच ते आजपर्यंत जामिनावर सुटू शकले नसल्याचे मत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान ‘लोकदरबार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयुक्तांनी कुरकुंभ ड्रग प्रकरण, पोर्शे अपघात, लोकसभा-विधानसभा निवडणुका, गेल्या वर्षभरातील खून आणि खुनाचा प्रयत्न या महत्त्वाच्या गुन्ह्यांची कमी झालेली टक्केवारी, अशा विविध विषयांवर संवाद साधला. आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पोर्शे प्रकरणानंतर आज सोशल मीडियावर एका स्टँडअप कॉमेडियनकडून पोर्शे कारमधील आरोपी सुटल्याचा दावा केला जात होता, तो दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगत आरोपी आजही जेलमध्येच आहेत.फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्नअनेकदा अशा प्रकरणांमध्ये सोशल मीडियावर फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. जबाबदार वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्सच्या लोकांना काय खरे आणि काय खोटे हे माहीत असते. शहरात कोणतीही कोयता गँग सक्रिय नाही, गँगवॉर सारखी स्थिती आहे, अशी कोणतीही परिस्थिती नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या वापराबाबत आपण सजग असणे गरजेचे असल्याचे पोलिस आयुक्त म्हणाले. खोटा प्रचार सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत, पोर्शे अपघातप्रकरणी ज्यांचा-ज्यांचा सहभाग आढळला, ते आरोपी गेल्या आठ महिन्यांपासून कारागृहात असल्याचे ठणकावून सांगितले. तसेच, या घटनेनंतर आम्ही जे केले त्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने आणखी उत्कृष्ट काही करता येऊ शकते का, याबाबत आवाहन केले होते. मुळात अशा प्रकरणांमध्ये कधी ब्लड सॅम्पल, डीएनएची पोलिस तपासणी करत नाहीत. हे पहिल्यांदाच या प्रकरणात झाले. त्यामुळेच आजही आरोपींना जामीन मिळालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासर्व प्रकरणांत माध्यमांची भूमिका देखील महत्त्वाची होती, असेही अमितेश कुमार म्हणाले. वर्षभरात विविध प्रकरणे...पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. गेल्या वर्षभरात पुणे पोलिसांनी देशातील सगळ्यात मोठे ड्रग तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करत ३ हजार ७०० कोटी रुपयांचे ड्रग जप्त केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी देखील कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाली नाही. पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी आजही जेलमध्ये आहेत.२०२४ मध्ये खुनाच्या घटनांमध्ये २०२३ च्या तुलनेत दर महिन्याला १७ टक्क्यांची घट आहे. खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात ३४ टक्के घट आहे. ही घट फक्त देवाच्या कृपेमुळे होऊ शकत नाही, तर यामागे पुणे पोलिस दलाकडून राबवलेल्या उपाययोजना देखील महत्त्वाच्या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मी यावर देखील संतुष्ट नसून यावर्षीचे माझे टार्गेट मी ठरवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही अलर्ट नसतो तर...काही घटना या आम्ही नियंत्रित करू शकतो, असे सांगत पोलिस आयुक्तांनी आंदेकर खून प्रकरण कदाचित आम्ही रोखू शकलो असतो, असे सांगितले. त्यानंतर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कुख्यात गुंड शरद मोहोळवर झालेल्या गोळीबारात तो मृत्युमुखी पडला. त्यानंतर यावर्षी त्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी एक गुन्हा होणार होता, तो आम्ही होऊ दिला नाही, यामुळे आम्ही अलर्ट नसतो, तर आणखीन एक घटना घडली असल्याचे आयुक्तांनी सांगितले. डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये घडलेली खुनाची घटना, सतीश वाघ खून प्रकरणात त्याच्याच बायकोने दिलेली खुनाची सुपारी अशा घटना घडण्यापूर्वी नियंत्रित करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसPorscheपोर्शेAccidentअपघात