शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:17 IST

दरम्यान, आता नेपाळच्या सामाजिक आणि धार्मिक संरचनेसंदर्भातही चर्चा होताना दिसत आहे...

नेपाळ सध्या मोठ्या राजकीय उलथापालथीतून मार्गक्रमण करताना दिसत आहे. राजधानी काठमांडूमध्ये जेन-झेड रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध तीव्र निदर्शने करत आहेत. संपूर्ण नेपाळमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. एक दिवस आधी संसद भवनावर झालेल्या हल्ल्यानंतर, संतप्त तरुणांनी पंतप्रधान केपी ओली यांच्या निवासस्थानावरही हल्ला केला. यानंतर पंतप्रधान ओली यांना राजीनामा देणे भाग पाडले. यातच ते देश सोडून गेल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान, आता नेपाळच्या सामाजिक आणि धार्मिक संरचनेसंदर्भातही चर्चा होताना दिसत आहे. प्रामुख्याने, नेपाळमध्ये किती हिंदू आहेत? किती मुस्लीम आहेत? त्यांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती कशी आहे, यासंदर्भात चर्चा होताना दिसत आहे. तर जाणून घेऊया, नेपाळमधील हिंदू आणि मुस्लीम लोकसंख्येसंदर्भात आणि समाजात त्यांचे स्थान कसे आहे, यासंदर्भात...

नेपाळमध्ये किती हिंदू? किती मुस्लीम? -नेपाळमध्ये २०२१ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार, देशाची एकूण लोकसंख्या सुमारे २.९७ कोटी एवढी आहे. एकूण लोकसंख्येच्या ८१.१९ टक्के हिंदू आहेत, अर्थात हिंदूंची लोकसंख्या सुमारे २ कोटी ३६ लाख एवढी आहे. २०११ च्या तुलनेत हिंदू लोकसंख्येत अल्पशी घट झाली आहे. एकेकाळी नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. मात्र, आता ते धर्मनिरपेक्ष देश बनले आहे.  

नेपाळमध्ये लोकसंख्येच्या बाबतीत मुस्लीम हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. २०२१ च्या जनगणनेनुसार, ५.०९ टक्के लोक मुस्लीम आहेत. अर्थात सुमारे १४ लाख ८३ हजार लोक इस्लाम धर्माचे पालन करतात. २०११ मध्ये ही संख्या ४.४ टक्के होती, जी आता ५.०९ टक्के झाली आहे, म्हणजेच ०.६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नेपाळमध्ये बहुतेक सुन्नी मुस्लीम राहतात. ते प्रामुख्याने भारताच्या सीमेला लागून असलेल्या तराई प्रदेशात स्थायिक आहेत. मुस्लीम लोकसंख्येच्या ९५ टक्के लोक येथेच राहतात.

नेपाळमधील इतर धर्मांसंदर्भात थोडक्यात - नेपाल मध्ये बौद्ध धर्म दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. नेपाळ हे बुद्धांचे जन्म स्थान आहे. यामुळे येथे बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे. येथीली 8.2 टक्के लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. यांची लोकसंख्या जवळपास 23 लाख 94 हजार एवढी आहे. याशिवाय, नेपाळमधील मूळ आदिवासी समुदायांमध्ये किरात धर्माचे पालन केले जाते. जनगणनेत त्याचा वाटा ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच, नेपाळमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या फार कमी आहे. मात्र, गेल्या दशकात यात ०.३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्थात नेपाळ अद्यापही हिंदू बहुल देश आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत येथे धार्मिक विविधता वाढताना दिसत आहे. 

टॅग्स :NepalनेपाळagitationआंदोलनHinduहिंदूMuslimमुस्लीम