शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 01:58 IST

Apple Event 2025 : अ‍ॅपलने iPhone 17 Pro मध्ये 6.3 इंचांचा डिस्प्ले तर iPhone 17 Pro Max ला 6.9 इंचांचा डिस्प्ले दिला आहे.

Apple ने मंगळवारी सर्वात शक्तिशाली iPhone 17 मॉडेल लाँच केले आहेत. यात iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max यांचा समावेश आहे. कंपनीने अपग्रेडेड डिझाइनशिवाय आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी दिली आहे. याशिवाय, कंपनी विशेष कॅमेरा अपग्रेड देत आहे. तसेच, युजर्सना, Apple Intelligence सह, विद्यमान डिव्हाइसेसच्या तुलनेत, अधिक चांगले रिअल-लाइफ युजेस मिळतील. तर जाणून घेऊयात या नवीन Pro मॉडेल्सच्या फीचर्ससंदर्भात.

अ‍ॅपलने iPhone 17 Pro मध्ये 6.3 इंचांचा डिस्प्ले तर iPhone 17 Pro Max ला 6.9 इंचांचा डिस्प्ले दिला आहे. हा 120Hz Pro Motion डिस्प्ले आहे. तसेच ऑलवेज-ऑन-डिस्प्ले (AOD) सपोर्टसह येतो. या अँटी रिफ्लेक्टिव्ह डिस्प्लेशिवाय, यात एल्युमिनियम फिनिशचे डिझाइन देण्यात आले आहे. या मोबाईलची रुंदी 8.7mm एवढी आहे. पॉवरफुल परफॉर्मंन्ससाठी कंपनीने A19 Pro चिप सेटही  दिला आहे. तसेच 12GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. 

वेपर चेंबर कूलिंग सिस्टम -कंपनीने प्रो मॉडल्समध्ये पहिल्यांदाच वेपर चेंबर कूलिंग सिस्टम दिले आहे. मोबाईलला 48MP फ्यूजन कॅमेरा, 48MP अल्ट्रा व्हाइड सेंसर आणि 48MP टेलीफोटो सेंसर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो 8x पर्यंत ऑप्टिकल झूम आणि 8K व्हिडिओ रिकॉर्डिंगशिवाय, डुअल व्हिडिओ रिकॉर्डिंग ऑफर करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी सेंटर स्टेज 24MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

वाचा - Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस

iPhone ची आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी - बॅटरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, iPhone 17 Pro मध्ये 3700mAh बॅटरी आणि 17 Pro Max मध्ये जवळपास 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याला रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्टदेखील देण्यात आला आहे. तसेच Max मॉडेलला आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हे eSIM ओनली डिव्हाइस आहे. 

वाचा - iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या

iPhone 17 Pro आणि 17 Pro Max ची किंमत -भारतीय बाजारात iPhone 17 Pro ची किंमत 134,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर iPhone 17 Pro Max ची किंमत 149,900 रुपयांपासून सुरू होते. हे फोन सिल्व्हर, डीप ब्लू आणि कॉस्मिक ऑरेंजमध्ये उपलब्ध असतील. यासाठी प्री-ऑर्डरही सुरू झाली आहे. डिलिव्हरी 19 सप्टेंबर पासून सुरू होईल.

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल