शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

भुरट्या चोरांसाठी पालिकेच्या ‘पायघड्या’

By admin | Updated: June 4, 2015 05:35 IST

डे्रनेजची झाकणे, पुतळ्यांचा परिसर, रस्ते तसेच पुलांवर लावण्यात आलेले रेलिंग, पीएमपी बसथांब्यांवरील अ‍ॅल्युमिनियम शीट, एवढेच काय, तर महापालिकेच्या

सुनील राऊत, पुणेडे्रनेजची झाकणे, पुतळ्यांचा परिसर, रस्ते तसेच पुलांवर लावण्यात आलेले रेलिंग, पीएमपी बसथांब्यांवरील अ‍ॅल्युमिनियम शीट, एवढेच काय, तर महापालिकेच्या पथदिव्यांना लावलेल्या फ्यूजवर भुरट्या चोरांकडून हात साफ केले जात असतानाच या चोरांसाठी पर्वणी म्हणून की काय, महापालिकेने नागरिकांना बसण्यासाठी स्टेनलेस स्टीलची महागडी बाकडे रस्त्यावर बसविण्याÞचा घाट घातला आहे. त्यासाठी प्रतिबाक ९ ते १0 हजार रुपये खर्च होणार असून, शहरातील ५0 टक्क्यांहून अधिक प्रभागांमध्ये हे बाक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एकीकडे महापालिकेने लावलेली लोखंडी बाकडे बसविण्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच लंपास होत असताना; ही स्टीलची बाकडे चोरांपासून सुरक्षित राहणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे नगरसेवकांना प्रभागात तत्काळ काही महत्त्वाची कामे निघाल्यास अथवा काही आवश्यक सोयीसुविधा नागरिकांना पुरवायच्या असल्यास त्यासाठी दिल्या जाणाऱ्या वॉर्डस्तरीय निधीतून ही स्टीलची बाकडे खरेदी केली जात आहेत. त्यामुळे एकीकडे चोरांसाठी पायघड्या घालून दुसरीकडे ही महागडी बाके खरेदी करून नागरिकांनी शहराच्या विकासासाठी जमा केलेल्या कराच्या रकमेची उधळपट्टी करण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे.स्टीलची बाकडे दुपटीने महाग नगरसेवकांच्या आग्रहाखातर महापालिकेकडून खरेदी केली जाणारी ही स्टीलची बाकडे लोखंडी बाकडांपेक्षा महाग आहेत. मागील वर्षापर्यंत खरेदी करण्यात येणाऱ्या बाकडांच्या किमती सुमारे ३ ते ४ हजार रुपयांपर्यंत आहे. तर या स्टीलच्या बाकडांच्या किमती ८ ते ९ हजार रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे ही बाकडे जवळपास दुपटीने महाग आहेत. त्यामुळे एका स्टीलच्या बाकडाच्या खरेदीत दोन लोखंडी बाकडे येतात. पण याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. यापेक्षाही विशेष बाब म्हणजे, ही बाकडे अनेक ठिकाणी नुसती ठेवण्यात आली असून, ती कोणासही उचलून नेणे सहज शक्य आहे. गेल्या वर्षभरात शहरात पीएमपीने अशाच प्रकारे स्टीलचे बसथांबे उभारले आहेत. या बसथांब्यांवरील बाकडे, स्टीलच्या जाळ्या, अ‍ॅल्युमिनियम शीटच्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. त्यामुळे ही बाकडे चोर सोडणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.