शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

मतांवर डोळा ठेवून युद्धाचे राजकारण- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 01:16 IST

निवडणुकीच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे, सगळ्यात जास्त जवान मोदी सरकारच्या काळात शहीद झाले

कळस : निवडणुकीच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे, सगळ्यात जास्त जवान मोदी सरकारच्या काळात शहीद झाले, मात्र किती दहशतवादी मारले याचा आकडा सांगितला जात नाही, युध्दाबाबत ठोस धोरण घेतले जात नाही, युद्धाचे परिणाम चांगले नसतात, तरी मतांवर डोळा ठेवून राजकारण केले जात आहे, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.शेळगाव (ता. इंदापुर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाची जाहिर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बाजारसमितिचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, सरपंच रामदास शिंगाडे,उपसरपंच तानाजी ननवरे,युवकाचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम शिंगाडे, अ‍ॅड अशोक शिंगाडे उपस्थित होते.पवार म्हणाले की, राज्यात दुष्काळी सावट आहे. उजनीचा वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही, भाजप शासनाकडून बाजार समिती, साखर कारखान्यात राजकारण केले जात. आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे अधिवेशन संपवावे लागले अशी परिस्थिती असतानाही भाजपकडून यामध्ये राजकारण केले जात आहे. कर्जमाफी केली नाही, शेतीमालाला भाव नाही, शेतकरी सन्मान योजना फसवी असून यांच्या काळात डान्सबार पुन्हा चालु केले गेले. यामुळे तरुण पिढी उध्वस्त होत आहे नोकरभरती फसवी आहे उद्योग पतींना सवलत दिली जात आहे. मात्र शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जात आहे. राज्यावर कजार्चा बोजा आहे. तालुक्यातील गटबाजी चालणार नाही इंदापूरने मला खासदार म्हणून मताधिक्य दिले. त्यामुळे इंदापूरला तालुक्याला विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले. रस्ते नेहमीच महत्वाचे आहेत माझ्या पेक्षाही जास्त निधी इंदापुरला भरणे यांनी दिला. प्रास्ताविक अ‍ॅड लक्ष्मणराव शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन देवडे यांनी केले>धनगर समाज आंदोलनाला भाजपाने रसद पुरवलीधनगर समाजाला आंदोलन करण्यासाठी भाजपने रसद पुरविली आंदोलन करत असताना आंदोलक हेलिकॉप्टर मधुन फिरत होते. आरक्षणावरुन दिशाभूल केली जात आहे. धनगर आरक्षणाबाबत टीस अहवाल धूळखात पडला आहे. धनगर समाजाला फसिवले जात आहे.मात्र अदिवासीच्या शैक्षणिक सवलती देणार असल्याचे जाहीर केले. मात्र अर्थसंकल्पात तरतूद केली त्यामुळे भाजपाने केवळ फसविण्याचे काम केले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी