साहित्य संमेलनात राजकारण्यांचा हस्तक्षेप
By Admin | Updated: October 17, 2014 23:39 IST2014-10-17T23:39:07+5:302014-10-17T23:39:07+5:30
साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे साहित्यिक मागे लोटले जात आहेत. निमंत्रण पत्रिकांवरही त्यांचेच वर्चस्व असते.

साहित्य संमेलनात राजकारण्यांचा हस्तक्षेप
पुणो : ‘‘साहित्य संमेलनामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे साहित्यिक मागे लोटले जात आहेत. निमंत्रण पत्रिकांवरही त्यांचेच वर्चस्व असते. ते व्यासपीठावरून गेल्यानंतर समोरील गर्दीही कमी होत जाते. मंडप ओस पडतात. त्यामुळे साहित्यिकांचा अपमान होतो. मला हा अपमान करून घ्यायचा नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी संमेलनातील राजकीय हस्तक्षेपावर खंत व्यक्त केली.
अक्षरधारा व राजहंस प्रकाशन यांच्यातर्फे आयोजित ‘मायमराठी शब्दोत्सव’ या उपक्रमामध्ये मतकरी यांची मुलाखत घेण्यात आली. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मतकरी यांच्या नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, श्रीकांत मोघे यांच्यासह विविध मान्यवरांनी मुलाखतीला आवजरून उपस्थिती लावली.
साहित्य संमेलनाध्यक्षपदाबाबत छेडले असता, ते म्हणाले, ‘‘मी संमेलनाध्यक्ष पदार्पयत पोहचू शकलो असतो, मात्र मला निवडणुकीचे राजकारण मान्य नाही. या पदासाठी कुणाच्या पुढे हात जोडणो किंवा भाषणो देणो शक्य नाही. त्यामुळे निवडणूक लढणार नाही. संमेलनांमध्ये राजकारणी व धनदांडगे स्वत:वर प्रकाश ओढवून घेतात.’’
समीक्षकांनी अनेक नाटकांची दखल घेतली नाही, असे थेट विचारले असता मतकरी यांनी समीक्षकांवर टीका केली. ते म्हणाले, खुप थोडे समीक्षक लेखन वाचतात. त्यांचा अभ्यास कमी असतो. (प्रतिनिधी)