शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

आध्यत्मिक गुरु येमूल गुरुजीच्या दरबारात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी नियमित लावत होते हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 11:06 IST

रघुनाथ येमूल हे सिद्धी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते स्वत:ला ‘ध्यानगुरु रघुश्री’ असे म्हणवून घेतात. याच नावाने ते दररोज सोशल मिडियावर दिवसाचे महत्व व शुभ मुहूर्त सांगत असतात.

ठळक मुद्देअनेक राजकीय नेते कोणतेही नवीन पाऊल टाकण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतात. प्रशासकीय अधिकारीही आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दरबारात जात असतात.

पुणे: औंधमधील प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेचे पायगुण चांगले नाहीत, तिच्यामुळे तू आमदार, मंत्री होऊ शकणार नाही, असा सल्ला देऊन तिच्या छळाला कारणीभूत ठरलेल्या आध्यामिक गुरु आणि ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूल यांच्या दरबारात अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी नियमित हजेरी लावत असत. त्यांचा भक्तगणही मोठा आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर पुणे शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रघुनाथ येमूल हे सिद्धी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते स्वत:ला ‘ध्यानगुरु रघुश्री’ असे म्हणवून घेतात. याच नावाने ते दररोज सोशल मिडियावर दिवसाचे महत्व व शुभ मुहूर्त सांगत असतात. ज्योतिषाचार्य म्हणून रघुनाथ येमूल यांची ख्याती आहे. त्यांना आपला हात दाखविण्यासाठी अपॉर्इंमेंट घ्यावी लागते. वैयक्तिक भेट घेऊन हात दाखविण्याचे ते ११ हजार रुपये घेत असल्याचे सांगितले जाते. हस्तरेषा पाहून ते भविष्य सांगतात. कॉपोरेट क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा आहे. अनेक जण त्यांच्याकडून मुहूर्त काढून त्यानंतरच पुढे पाऊल टाकतात. अनेक राजकीय नेते कोणतेही नवीन पाऊल टाकण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतात. प्रशासकीय अधिकारीही आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दरबारात जात असतात. औंधमधील गायकवाड कुटुंबही त्यांचे भक्त बनले होते.

गणेश गायकवाड अजूनही फरार  

तुझी पत्नी पांढर्‍या पायगुणाची आहे. तिचे ग्रहमान दुषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार ही होणार नाही व मंत्री ही होणार नाही. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा हा तिचेकडून काढून घे. तसेच मी देतो हे लिंबु उतरविल्यानंतर तुझ्या मागची ही पिडा कायमची निघुन जाईल, असे गणेश गायकवाडला सांगितले होते. त्यांच्या भविष्यवाणीमुळेच केदार गायकवाड याने आपल्या पत्नीचा छळ केला. तिला सिगारेटचे चटके दिले. मारहाणीत तिला बहिरेपणा आला. त्यांचा छळ करुन त्यांना घराबाहेर काढले होते.

नानासाहेब व त्यांचा मुलगा गणेश ऊर्फ गायकवाड यांच्याविरुद्ध जमिनी बळकावणे, खंडणी चे हिंजवडी, सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गणेश गायकवाड याने नुकताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. सध्या गणेश गायकवाड फरार आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMLAआमदारPoliceपोलिसArrestअटक