शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांकरिता पोलिसांची ‘‘पॉलिसी’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 16:36 IST

वाहतूकीचे नियमाचे पालन करणाऱ्यांना मिळणार लाभ....

ठळक मुद्देपुणे वाहतूक पोलिस आणि बजाज अलाएन्स इन्शुरन्स उपक्रम वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या पुणेकरांना मोटार विमा खास सवलतीत मिळणारनागरिकांमध्ये वाहतूक नियमांबद्द्लची जागरुकता वाढीस लागावी हा उद्देश

पुणे : पुणेकरांनी वाहतूक नियमाबाबत अधिक सजग आणि जागरुक होत नियमांचे पालन करावे या हेतुने पुणे वाहतूक पोलिस व बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्सच्यावतीने अभिनव उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. यात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या पुणेकरांना मोटार विमा खास सवलतीत मिळणार आहे. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबद्द्लची जागरुकता वाढीस लागावी या उद्देशातून याप्रकारच्या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.  गुरुवारी पुणे पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ.संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, बजाज अलियांंझ जनरल इन्शुरन्सचे सीईओ तपन सिंघेल आणि ससिकुमार अदिमामु उपस्थित होते. डॉ.व्यंकटेशम म्हणाले, 2018 मध्ये 240 जणांना जीवघेण्या अपघाताला सामोरे जावे लागले. 2019 मध्ये ती संख्या 197 इतकी आहे. प्रशासनाने सातत्याने राबविलेल्या विविध वाहतूक नियमाच्या उपक्रमामुळे 43 जीवघेणे अपघात कमी करण्यास सुरु अपघातात जीव गमावावा लागला. यापुढील काळात वाहतूकीची शिस्त आणि नियम पाळणा-यांकरिता त्यांना मोटार विम्यात सवलत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वर्षभरात ज्या वाहतूकदारांनी नियमांचे पालन केले आहे त्यांना यात सहभागी होणार आहे. पुण्यासारख्या शहरात याप्रकारच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास इतर जिल्हयात देखील तो राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  सिंघेल यांनी इन्शुरन्सविषयी माहिती दिली. ते म्हणाले, वाहतूक नियम पालनाला चालना मिळावी याकरिता मोटार वाहन इन्शुरन्स सवलतीत देण्याचा मानस आहे. या कामी पुणे वाहतूक पोलिसांचे सहकार्य मिळणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. विम्याचा लाभ घेण्याकरिता नागरिकांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन सिंघेल यांनी केले. विम्याकरिता वर्षभराचा कालावधी ठेवण्यात आला असून त्यात कुठल्याही प्रकारचा दंड न झालेल्या नागरिकांना सवलतीत विमा काढता येणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर