शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नशीब बलवत्तर म्हणून वाचले : जखमींना वाचवणारे पोलिसच झाले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 18:19 IST

अचानक झालेल्या घटनेत आधीच्या अपघातग्रस्तांना आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याच्या गडबडीत वाहनचालक आणि त्याच्या साथीदारांना पळून जाण्यात यश आले आहे.

पुणे :  अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनाला ठोकर देत अज्ञात कारचालक निघून गेल्याची घटना पुण्यात घडली आहे. अचानक झालेल्या घटनेत आधीच्या अपघातग्रस्तांना आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याच्या गडबडीत वाहनचालक आणि त्याच्या साथीदारांना पळून जाण्यात यश आले आहे. या संदर्भात पोलीस हवालदार एम बी पशाले यांनी तक्रार दिली आहे. 

         याबाबत घडलेली घटना अशी की, दूध व्यावसायिकांच्या संपामुळे बावधन पोलीस चौकीतील कर्मचारी साहाय्यक पोलिस निरीक्षक पगारे, पोलीस हवालदार शिंदे, पशाले आणि पाटील यांच्यासह खबरदारी म्हणून गस्त घालत होते. त्यावेळी  चांदणी चौकापासून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ते असताना त्यांना बावधन पुलावर पडलेली मोडेप आणि बाजूला दोन जखमी व्यक्ती दिसल्या. त्यांना मदत करण्यासाठी उतरत असताना त्यांनी आपले वाहन कडेला घेण्यास सुरुवात केली. मात्र इतक्यात भरधाव वेगाने येत एका कारने त्यांच्या जीपला मागच्या बाजूने जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की संबंधित कारचा जागेवर चक्काचूर झाला होता. 

          या अपघातात एअर बॅग असल्याने कारमधील कोणीही जखमी झाले नाहीत.मात्र पोलिसांपैकी तिघांना किरकोळ दुखापत झाली तर हवालदार शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी अचानक झालेल्या आणि आधीच्या अपघातातील जखमींना वाचवण्याच्या प्रयत्नात कारमधील चारही व्यक्तींनी संधीचा फायदा घेत पळ काढला. हे चौघेही जण गाडीत अपघातसमयी जीपमध्ये असल्यामुळे वाचले असून बाहेर असते तर भीषण घटना घडण्याची शक्यता होती असा अंदाज वर्तवण्यात येतो. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे यांनी  बोलताना सांगितले की, धडक अत्यंत जोरात होती. त्यामुळे आमच्या गाडीचे एक टायर फुटले तर कारचे मोठे नुकसान झाले. मात्र जखमींना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याने कार चालकांना घटनास्थळावरून निघून जाण्यात यश आले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसAccidentअपघातCrimeगुन्हा