शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पोलिसाच्या पत्नीने 'खाकीवर्दी'लाच गंडवलं; बदला घेण्यासाठी सुनेला सोनसाखळी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 22:33 IST

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात २२ जून रोजी एक साडे पाच तोळे सोनसाखळी (गंठण) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सचिन सिंग - वारजे : एखाद्या चित्रपटातल्या कथानकालाही लाजवेल अशी घटना वारजे माळवाडीत घडली आहे. सासू सुनेचे भांडण कुठल्या थराला जाईल याचा काही अंदाज भल्याभल्यांना लावता येत नाही. याचीच प्रचिती वारजे पोलिसांना एका सोनसाखळी चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना आली आहे. विशेष म्हणजे यात पोलिसांना चक्रावून टाकणारी उघडकीस आली असून गुन्हा दाखल करणारी महिला ही एका पोलिसाची बायको आहे. 

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात २२ जून रोजी एक साडे पाच तोळे सोनसाखळी (गंठण) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार; फिर्यादी अलका दिलीप फडतरे (वय ६० रा. धायरी) या २२ तारखेला सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास वारजे स्मशानभूमी रस्त्यावरून नातेवाईकांकडे जात असताना मोटारसायकलवर दोघे जण आले. यात एक पुरुष व एक तरुण महिला होत्या. त्यांनी हिसका मारून गंठण पळवून नेल्याचे तक्रारीत सांगितले होते. या दोन लाखांच्या चोरी झाल्याचे दाखविण्यासाठी त्यांनी एक गौतम यादव नावाचा खोटा साक्षीदारही तयार केला व त्याने आपण दुरून ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा पोलिसांना दिलेल्या जबाबात केला.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके व डीबी प्रमुख उपनिरीक्षक अशोक येवले यांना संबंधित महिलेने दिलेल्या दुचाकीच्या नंबरबाबत शंका आली. पोलिसांनी महिलेने सांगितलेल्या दुचाकी क्रमांकानुसार (एमएच ३७ यू २७९) संशयित वाहन चालक वैभव गाडे यास पिंपळे सौदागर येथून ताब्यात घेतले. पण त्या दिवशी व महिलेने सांगितलेल्या वेळी दुचाकीसह आपण पिंपळे सौदागर येथे आपल्या घरी असल्याची माहिती दिली. 

या प्रकरणी अलका फडतरे या फिर्यादी असल्याचे कळताच त्याने पोलिसांना जो उलगडा केला. त्यावर पोलीस देखील चक्रावून गेले.

फिर्यादी यांचा लहान मुलगा अमोल व त्यांची सून अनामिका (नाव बदलले आहे) यांचे लग्न ४ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांनीच पती पत्नीत बेबनाव झाल्याने व भांडणे असह्य झाल्यावर अनामिका ही माहेरी निघून आली व तिने सासरच्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. व त्यांची कोर्टात घटस्फोट केस चालू आहे. 

दरम्यान मेडिकल क्षेत्रातील अनामिका ही याच क्षेत्रातील त्याचा मित्र व गुन्ह्यातील तथाकथित दुचाकीस्वार आरोपी वैभव गाडे याच्या बरोबर फिरते व आपला घटस्फोट झाल्यावर दोघे लग्न करणार असल्याची कुणकुण अलका व तिचा मुलगा अमोल याला लागली. म्हणून तिचे चांगले होऊ नये या उद्देशाने त्यांनी साखळी चोरीचा खोटा गुन्हा दाखल करून वैभव व अनामिका यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या सतर्कतेने त्यांची खेळी उलटी पडली आहे.

पती पोलीस सेवेत... विशेष म्हणजे अलका यांचे पती पोलीस सेवेत होते व प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी नुकतीच सक्तीची निवृत्ती घेतली आहे. या प्रकरणी त्या तथाकथित साक्षीदार यादव यास न्यायालयात हजर करून न्यायालयाचा संमतीने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Warje Malwadiवारजे माळवाडीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसWomenमहिला