शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

पोलिसांना आता कुत्र्याचा घ्यावा लागणार शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 12:06 AM

फुरसंगी : जर्मन शेफर्ड जातीचा अडीच वर्षांचा टायसन नावाचा पाळीव कुत्रा हरविल्याबाबतचा तक्रारी अर्ज हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

फुरसंगी : जर्मन शेफर्ड जातीचा अडीच वर्षांचा टायसन नावाचा पाळीव कुत्रा हरविल्याबाबतचा तक्रारी अर्ज हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. यामुळे पोलीसही अवाक् झाले आहेत. आता पोलिसांना माणसांबरोबरच हरवलेल्या पाळीव जनावरांचा शोध घ्यावा लागणार आहे, याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.याबाबत टायसनचे मालक नितीन शिंदे (रा. रिव्हर पार्क, सोनारपूल, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी तक्रार अर्ज केला आहे. शिंदे यांच्या तक्रार अर्जानुसार, या अडीच वर्षांच्या टायसन कुत्र्याला ते गेली अनेक महिने सांभाळत होते. २२ आॅक्टोंबर रोजी दुपारी एक वाजल्यापासून तो अचानक घरासमोरून बेपत्ता झाला. त्याचा कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर त्यांनी टायसन हरविल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.टायसन हा कुत्र्याला परिसरातील अनेक लोक शिंदे यांच्याकडे विकत मागत होते. मात्र, तो आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग होता व त्याचा लळा घरातील सर्वांना लागला होता. त्यामुळे आम्ही त्याला विकत नव्हतो. टायसनला विकत मागणा-यांपैकी कोणीतरी एकानं त्याला चोरले असावे, असा संशय शिंदे यांनी तक्रार अर्जात व्यक्त केला आहे. तसेच आमच्या लाडक्या टायसनला शोधून आमच्या ताब्यात द्यावा, अशी विनंती पोलिसांना त्यांनी केली आहे. या तक्रार अर्जावर सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेdogकुत्रा