शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

काय सांगता! 'एमपीएससी' आंदोलनातील पोलीस निघाले कोरोनाबाधित; विद्यार्थ्यांसह पोलीस दलात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 13:41 IST

पोलीस दलासह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पुणे : 'एमपीएससी' ची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. मात्र, आता या आंदोलनासंबंधी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आंदोलनावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या विशेष शाखेतील दोन अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे पोलीस दलासह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील पोलिसांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. 

आतापर्यंत पुणे पोलीस दलातील १ हजार ५३० पोलिसांना कोरोना झाला असून यामधील ४२ पोलिसांवर अद्यापही उपचार सुरू आहे. शहरात सध्या कोरोनाग्रस्त ४२ पोलिस उपचार घेत असून त्यामध्ये ९ अधिकारी व ३३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच ४२ पैकी १६ पोलिस हॉस्पिटलमध्ये तर २६ जण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृह विलगीकरणात आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हा वाढत प्रादुर्भाव आटोक्यात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. पण नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधनात्मक नियमांचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे प्रशासनासमोर वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 

पोलीस दलातही कोरोना संसर्गाचा वेढा शहरात रात्री १० ते ६ पर्यंत संचारबंदी असल्याने पोलिसांचा अनेक ठिकाणी नाकाबंदीसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. मात्र याच संचारबंदीच्या काळात रस्त्यावर कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येत आहे.त्यामुळे पोलीस दलात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढतो आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीPoliceपोलिस