शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘हायप्रोफाइल’ चोरांमुळे चक्रावले पोलीस

By admin | Updated: August 10, 2015 02:47 IST

राहणीमान उच्च दर्जाचे... तो राहतोही मार्केट यार्ड येथील उच्चभ्रू गंगाधाम सोसायटीमध्ये... कॉल सेंटरमध्ये उच्चपदस्थ नोकरी... पण धंदा चोरीचा..

लक्ष्मण मोरे, पुणेराहणीमान उच्च दर्जाचे... तो राहतोही मार्केट यार्ड येथील उच्चभ्रू गंगाधाम सोसायटीमध्ये... कॉल सेंटरमध्ये उच्चपदस्थ नोकरी... पण धंदा चोरीचा... या ‘व्हाइट कॉलर’ चोरट्याने गेल्या काही दिवसांत थोड्या-थोडक्या नव्हे, तर तब्बल ५० महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावल्याचे समोर आले आहे. कोंढवा पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ४० लाखांचे १५० तोळे सोने हस्तगत केले आहे. एका उच्चशिक्षित चोरट्याचा हा प्रताप पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. गिरीश रामदास नायक (वय ५०, रा. फ्लॅट क्रमांक ३०८, एच १, गंगाधाम फेज २, मार्केट यार्ड) असे उच्चभ्रू चोरट्याचे नाव आहे. नायक उच्चशिक्षित असून पत्नी आणि मुलांसोबत तो राहतो. त्याची पत्नीही उच्चशिक्षित आहे. तो सध्या एका कॉलसेंटरमध्ये उच्चपदस्थ म्हणून नोकरीही करीत होता. नायक याला कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. त्याच्याकडून चोरीच्या २० दुचाकींसह १ मोटार जप्त करण्यात आली होती. ही चोरलेली वाहने त्याने विजयन शिवनकुमार (वय ४१, रा. एफ ब्लॉक, पॅलेडियम होम्स, धानोरी) याला विकली होती. विजयन याने ही वाहने विना कागदपत्रांचीच नागरिकांना विकली. या वाहनांची ना कधी वाहतूक पोलिसांनी तपासणी केली ना आरटीओने. नायक याच्यावर १९९५ आणि १९९६ साली डेक्कन, कोथरूड, खडक आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे सात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या पत्नीला त्याच्या या कृत्यांबद्दल माहिती होती. या चोरीच्या वाहनांचा वापर करूनच नायकने घराजवळच्या भागात तब्बल ५० महिलांच्या गळ्यातील ऐवज हिसकावला. महागडे कपडे घालून नायक रस्त्यावरून एकटाच फिरायचा. लॉक न केलेल्या दुचाकी हेरून या दुचाकी ढकलत लांबवर न्यायचा. जस्ट डायलवरून चावी बनवणाऱ्यांचे क्रमांक घेऊन त्यांना बोलावून चावी बनवून घ्यायचा. अशा प्रकारे त्याने बिबवेवाडी, सहकारनगर, मार्केट यार्ड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधून २० दुचाकी आणि एक मोटार चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी ही वाहने जप्त केली आहेत. या चोऱ्यांची सुरुवात झाली ती एका फायनान्स कंपनीने हप्ते थकल्यामुळे त्याची मोटार उचलून नेल्यानंतर. चोऱ्या करीत असताना तो कधी टोपी तर कधी मास्क वापरत होता. या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोनसाखळीचोरीच्या गुन्ह्यांमधील उपलब्ध फुटेजमधील एका आरोपीप्रमाणे तो दिसत असल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, परिमंडल चारचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी त्यादृष्टीने तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिल्यावर सुरुवातीला सोनसाखळीचोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक नितीन अतकरे, सुभाष जाधव, कैलास साळुंके, बशीर सय्यद, राजस शेख, संतोष तानवडे, कैलास आखुटे, गणेश गायकवाड, रमेश राठोड, संतोष सोनावणे, सचिन गायकवाड, उमाकांत स्वामी यांच्या पथकाने नायककडून सोनसाखळीचोरीचे तब्बल ४८ गुन्हे उघडकीस आणले. पोलिसांसमोर आता मौजमजेची ‘चटक’ भागवण्यासाठी अशा चोऱ्या करणाऱ्यांचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.