शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तडीपारीची कारवाई नावापुरतीच : गुंडांचा शहरातच वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 15:37 IST

गुन्हेगार आपल्या परिसरात दहशत पसरवून वेगवेगळे गुन्हे करीत असल्याने त्याच्यावर वचक बसवा यासाठी त्याला पुणे शहर व जिल्ह्यातून एक ते दोन वर्षांसाठी तडीपार करतात़. ही गंभीर कारवाई समजली जाते़. पण

ठळक मुद्देखटल्याची तातडीने सुनावणी घेण्याचा प्रयत्नपुणे शहर पोलिसांकडून गेल्या आठ महिन्यात ९२ जण शहर व जिल्ह्यातून तडीपार तडीपारी आदेशाचा भंग केल्याने शहरात आढळणाऱ्या गुन्हेगारांची संख्या वाढलेली

विवेक भुसे पुणे : गुन्हेगार आपल्या परिसरात दहशत पसरवून वेगवेगळे गुन्हे करीत असल्याने त्याच्यावर वचक बसवा यासाठी त्याला पुणे शहर व जिल्ह्यातून एक ते दोन वर्षांसाठी तडीपार करतात़. ही गंभीर कारवाई समजली जाते़. पण  गुन्हेगार तडीपार केल्यानंतर काही दिवसातच पुन्हा शहरात लपून छपून राहत असल्याचे दिसून आले आहे़. पोलीस जेवढ्या गुन्हेगारांना वर्षभरात तडीपार करतात, त्यापेक्षा अधिक गुन्हेगार तडीपारीचा भंग करताना दिसून येत आहे़. चिंचवड येथे ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारालाही पोलिसांनी तडीपार केले होते़. तरीही तो तडीपारीचा भंग करुन चिंचवड येऊन हा गुन्हा करत असल्याचे उघड झाले आहे़. पुणे शहर पोलिसांनी गेल्या आठ महिन्यात ९२ जणांना शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते़. याच काळात पोलिसांनी वेगवेगळ्या वेळी घेतलेल्या नाका बंदी तसेच कोंबिंग आॅपरेशनमध्ये तब्बल १५० गुन्हेगार आढळून आले आहेत़. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार त्यांच्या १४२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे़. काही दिवसांपूर्वीच चतु:श्रृंगी पोलिसांनी एका सराईत घरफोड्याला पकडून त्याच्याकडून तब्बल ३० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते़. त्याला पोलिसांनी तडीपार केले होते़ तडीपारीच्या काळातच तो पुणे शहरात येऊन घरफोडी करीत असल्याचे निष्पन्न झाले होते़. अशाप्रकारे अनेक गुन्हेगारांनी ते तडीपार असतानाही खुलेपणे आपल्या परिसरात वावरत असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे़. पोलिसांकडून गुन्हेगार चेकींग वाढल्याने तडीपारीचा भंग करणारे गुन्हेगार अधिक संख्येने आढळत असल्याचे दिसून येत आहे़. एखाद्या गुन्हेगारावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे असताना पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्याच्या कारवाया थांबत नाहीत़. तो रहात असलेल्या परिसरात दहशत पसरवून गुन्हे करत राहतो. तेव्हा संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या गुन्हेगाराच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करतात़. तो सहायक पोलीस आयुक्त तपासून पोलीस उपायुक्तांना सादर केला जातो़. पोलीस उपायुक्त त्या प्रस्तावाची छाननी करुन त्यावर सुनावणी घेतात़. त्यानंतर संबंधित गुन्हेगाराला तडीपार करायचे की नाही याचा निर्णय घेतला जातो़. गुन्हेगाराला साधारण एक ते दोन वर्षे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले जाते़. त्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेऊन त्याची दुसऱ्या जिल्ह्यात रवानगी करतात़. याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले की, पोलिसांचा अलर्टनेस वाढल्याने तडीपारी आदेशाचा भंग केल्याने शहरात आढळणाऱ्या गुन्हेगारांची संख्या वाढलेली दिसून येत आहे़. गेल्या महिन्यात तडीपारीचा भंग करणाºया गुन्हेगाराला पकडल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले़. त्याच्याविरुद्ध २४ तासात दोषारोप पत्र सादर करुन त्याची सुनावणी तातडीने घ्यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली़. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने त्याची संपूर्ण सुनावणी घेतली व त्या गुन्हेगाराला १ वर्षाची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती़. .............तडीपारीचा भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसावा, यासाठी अशा पकडलेल्या गुन्हेगारांवर १४२ अन्वये कारवाई केल्यावर त्याच्यावरील गुन्ह्याची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला करुन अशा गुन्हेगारांना शिक्षा होईल, हे पाहण्याचा प्रयत्न पोलिसांकडून यापुढील काळात केला जाणार आहे़. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त ................पुणे शहर पोलिसांनी केलेली तडीपारीची कारवाई

वर्ष        तडीपार    आदेशाचा भंग करणारे गुंड२०१६        १४९    १३२२०१७    ११४    २६०२०१८        ९२    १५०(आॅगस्ट 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस