शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

२६/११चा हल्ला अनुभवून प्रेरणा घेतलेला तरुण झाला पोलीस उपनिरीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 8:41 PM

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून प्रेरणा घेत अविनाश किसनराव वाघमारे हा तरुण पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. 

 

पुणे : प्रेरणा ही ध्येयाच्या जवळ सर्वांत महत्वाची गोष्ट मानली जाते. एखाद्या प्रेरणेने झपाटलेल्या व्यक्तीने अशक्य गोष्टही शक्य करून दाखवल्याची उदाहरणे अनेकदा बघायला मिळतात. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून प्रेरणा घेत अविनाश किसनराव वाघमारे हा तरुण पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. 

           भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचा कणा असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सुमारे १६६ निर्दोष व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. त्यात हेमंत करकरे,अशोक कामठे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे या बहादूर पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र याच हल्ल्याच्या ठिकाणी हजार असलेल्या आणि  सुदैवाने प्राण वाचलेल्या अविनाश यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याला, कर्तृत्वाला प्रेरणा मनात ११ वर्षांनंतर पोलीस  उपनिरीक्षकपदाचे स्वप्न पूर्ण केले आहे. 

           अविनाश हे पुणे जिल्यातील खेड तालुक्यातील रहिवासी. सरकारी नोकरीत असलेल्या वडिलांपासून प्रेरणा घेत त्यांनी आपले स्वप्न साकार केली आहे. एमबीए झालेल्या अविनाश यांचे चांगल्या पगाराच्या नोकरीत मन रमत नव्हते. अखेर  रामराम ठोकत कष्टाने त्यांनी ध्येयपूर्ती केली आहे. याबाबत ते सांगतात, 'मी एका नातेवाईकाला भेटायला मुंबईला गेलो होतो. त्यावेळी मला मुंबईत फारशी माहिती नसल्याने संबंधित नातेवाईकाने मला सी.एस. टी. स्टेशनला यायला सांगितले. त्यावेळी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक गोळीबाराचे आवाज येण्यास सुरुवात झाली आणि मी इतर लोकांच्या सांगण्याप्रमाणे पळतच स्टेशनच्या बाहेर पडलो. बाहेर आल्यावर काही वेळाने दहशतवादी हल्ला झाल्याचे समजले. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून वाचल्याची जाणीव झाली. या दरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या अलौकिक शौर्याचा माझ्यावर मोठा परिणाम झाला आणि मी पोलीस खाते हेच माझे ध्येय म्हणून निश्चित केली. त्यादृष्टीने पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीची तयारी केली आणि उत्तीर्ण झालो.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला