शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

पोलिसांनी कर्तव्य बजावताना देशसेवा, राष्ट्रहित जोपासावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 03:15 IST

राष्ट्रीय पोलिस महासंचालक परिषदेची सांगता

पुणे : पोलीस म्हणून कर्तव्य बजावताना त्यांच्यावर अनेक ताण, तणावांना सामारे जावे लागते़ त्यातूनच मार्ग काढत गरिबांचे कल्याण लक्षात ठेवून पोलिसांनी कर्तव्य बजावताना राष्ट्रहितासाठी काम करणे सुरु ठेवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले़ राष्ट्रीय पोलीस महासंचालक परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रीय स्तरावरील पोलिस महासंचालकांच्या ५४ व्या तीन दिवसीय परिषदेची सांगता रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने झाली. यावेळी गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय गृह राज्यमंत्री जी़ किशन रेड्डी, नित्यानंद राय यांच्यासह पोलिस व गुप्तचर विभागाचे अतिवरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांचे शुक्रवारी रात्री पुण्यात आगमन झाले़ शनिवार आणि रविवारी असे दोन्ही दिवस त्यांनी या परिषदेला उपस्थित राहून सर्व प्रमुख वक्त्यांनीमांडलेली मते लक्षपूर्वक ऐकली़ शनिवारी दुसऱ्या सत्रात पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून देशातील अंतर्गत सुरक्षा यांच्यासह दहशतवाद, नक्षलवाद, किनारपट्टी सुरक्षा, सायबर सुरक्षा, कट्टरतावाद आणि अमली पदार्थ तस्करी या सारख्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या बाबतीत जागरूक राहण्याबाबत चर्चा केली. यावेळी मोदींच्या हस्ते गुप्तचर यंत्रणामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाºया अधिकाºयांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपतींच्या पोलिस पदकाने त्यांना गौरविण्यात आले.

देशातील शांतता राखण्यासाठी देशाच्या पोलिस दलाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करुन मोदी यांनी सांगितले की, पोलिसांच्या पाठीशी त्यांचे कुटुंबीय ठामपणे उभे राहतात़ पोलिसांच्या कुटुंबियांनी दिलेल्या या योगदानाला विसरुन चालणार नाही. महिला व बालकांसह समाजातील सर्व घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी नेहमी प्रयत्न केले पाहिजे.एकंदर देशातील स्त्रियांना सुरक्षिता आणि सुरक्षित वाटेल, अशा प्रभावी पोलिसिंगच्या भूमिकेवर सर्वाधिक भर दिला पाहिजे. समारोपानंतर पंतप्रधान मोदी हे हवाई दलाच्या खास विमानाने दिल्लीला रवाना झाले.

देशात अखिल भारतीय पोलीस विद्यापीठाचा मानस

पोलीस महासंचालकांच्या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वैचारिक कुंभ असे संबोधले आहे़ लवकरच देशातील काही राज्यात अखिल भारतीय पोलिस विद्यापीठ आणि अखिल भारतीय फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ यांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

पोलीस दल सक्षम करणार - रेड्डी

देशातील सर्व राज्यातील पोलीस दलांचे सक्षमीकरण करणार केंद्र सरकार लक्ष देत आहे़ त्यासाठी केंद्र सरकार आवश्यक तो निधी कमी पडू देणार नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी़ किशन रेड्डी यांनी सांगितले़ त्यांनी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रातील पोलीस हुतात्मा स्मारकाला भेट दिली व हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMumbai policeमुंबई पोलीसPuneपुणेPoliceपोलिस