खडकवासला येथे सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 04:52 PM2020-01-28T16:52:47+5:302020-01-28T17:52:15+5:30

आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द यापूर्वी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल

Police seize pistols and live cartridges at Khadakwasla area | खडकवासला येथे सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त 

खडकवासला येथे सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त 

Next

खडकवासला:  येथील सिंहगड रस्त्यावर चौकात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने एका सराईताकडून  कारसह गावठी पिस्तूल  व जिवंत काडतुस जप्त करून त्याला अटक केली आहे.ही कारवाई मंगळवारी ( २७ जानेवारी) सायंकाळी गुन्हे शाखेचे पथक सिंहगड रोड परिसरात रेकॉर्डवरील फरारी आरोपीचा शोध घेत असताना येथील दत्तात्रय शिवाजी मते हा दहशतीसाठी त्याचेजवळ गावठी पिस्तूल बाळगून कारने (एमएच-१२ ईएक्स ६१७४)  एनडीए रोडने सिंहगड बाजूकडे येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. 
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथकाने साध्या वेशात खडकवासला धरण चौकात सापळा रचून दत्तात्रय शिवाजी मते (वय ४५ वर्षे) रा.खडकवासला, ता.हवेली यास अटक करून विनापरवाना गावठी पिस्तूल  व १ जिवंत काडतुस असा कारसह रुपये (दोन लाख चारशे) रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द यापूर्वी हवेली व उत्तमनगर या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच रेकॉर्डवरील फरारी आरोपी यांना पकडण्याच्या कामी विशेष मोहिम राबवण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या यांनी आदेश दिलेले होते.  त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक  पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, दयानंद लिमन, रवि शिनगारे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, ज्ञानदेव क्षीरसागर, दत्ता तांबे, अक्षय जावळे यांचा या पथकात समावेश होता .   आरोपीने पिस्तुल व काडतुस कोठून आणले? कोणत्या कारणासाठी ते जवळ बाळगले? याबाबतचा अधिक तपास हवेली पोलीस स्टेशन करीत आहेत.
 

Web Title: Police seize pistols and live cartridges at Khadakwasla area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.