शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

अभ्यास न झाल्याने आत्महत्येच्या इराद्याने गेलेल्या तरुणीचा पोलिसांकडून तातडीने शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 2:32 PM

कसबा पेठेतील एका महिला गुरुवारी दुपारी साततोटी पोलीस ठाण्यात आली व तिने आपल्या २० वर्षांच्या मुलीने लिहिलेली चिठ्ठी दाखविली़..

ठळक मुद्देसमुदेशनाने मतपरिवर्तन

पुणे : नेटच्या परीक्षेत तीनदा अपयश आल्यानंतरही यंदा अभ्यास न झाल्याने आत्महत्या करण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या तरुणीचा फरासखाना पोलिसांनी तातडीने शोध घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन केले़. अभ्यास झेपत नसेल तर दुसरा एखादा कोर्स कर, असे सांगून पोलिसांनी तिचे समुपदेशन केले व पालकांनाही तिच्यावर दबाव न टाकण्यास सांगितले़. पोलिसांच्या प्रयत्नामुळे एक घर उध्वस्त होण्यापासून बचावले़. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा पेठेतील एका महिला गुरुवारी दुपारी साततोटी पोलीस ठाण्यात आली व तिने आपल्या २० वर्षांच्या मुलीने लिहिलेली चिठ्ठी दाखविली़. त्यात चिठ्ठीत तिने मी जीवाचे बरेवाईट करणार असून घरातून निघून जात असल्याचे लिहिले होते़. पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांनी त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांना सांगितली़. पोलिसांनी अधिक माहिती घेतली़, तेव्हा ही तरुणी नेटच्या परीक्षेचा अभ्यास करत होती़ तीन वेळा तिने परीक्षा दिली होती़. पण, त्यात तिला यश आले नव्हते़ यंदाही तिचा अभ्यास झाला नव्हता, त्यामुळे तणावाखाली ती घरातून जाताना आईचा मोबाईल घेऊन बाहेर पडली होती़. ही माहिती समजताच पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासण्यास सुरुवात केली़. तेव्हा मोबाईल बंद आढळला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन माहिती काढली. तेव्हा रात्री ९ वाजता ती सिंहगड किल्ल्याच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली़. पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे व त्यांचे सहकारी, तिचे आईवडील तातडीने सिंहगड किल्याच्या परिसरात तिचा शोध घेऊन लागले़. तेव्हा तेथील बसस्टॉपवर गर्दी दिसली़. त्यात ही तरुणी दिसली़. तिला पोलीस ठाण्यात आणल्यावर विचारपूस केली़ तेव्हा तिने सांगितले की, अभ्यास नीट न झाल्याने माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला. आईचा मोबाईल घेऊन सिंहगड किल्ल्यावर जाण्यास निघाले़. शनिवारवाड्याहून पीएमपी बसने सिंहगड येथे आले़ तोपर्यंत रात्र झाली होती़. त्यामुळे डोंगरा येथील मंदिरात बसून होते़. रात्री उशीर झाल्याने परत जाणारी शेवटची बस पण गेली होती़ तेथे लोक जमले़ तेवढ्यात पोलीस व आईवडील आले, असे तिने सांगितले़. किशोर नावंदे यांनी या तरुणीला समजावून सांगितले की, तुला अभ्यास झेपत नसेल तर दुसरा कोर्स कर व आई वडिलांनाही सांगितले की, मुलीवर दबाव आणू नका़ तिला जो अभ्यासक्रम आवडतो़ तो तिच्याकडून करुन घ्यावा़. यावर ती तरुणी स्वखुशीने तयार झाली़. आईवडिलांनीही तिने नेटची परीक्षा द्यावी म्हणून आम्ही दबाव टाकणार नाही़, तिला जे आवडते तो कोर्स तिने करावा़. आम्ही तिच्या पाठीशी आहोत, असे मान्य केले़. दोघांचेही समुपदेशन केल्यानंतर तरुणी आपल्या आईवडिलांबरोबर घरी गेली़. आईवडिल व मुलीकडून जी अपेक्षा करतो़. त्यामुळे मुलांना टेन्शन येऊन ती आत्महत्येपर्यंत टोकाची भूमिका घेतात़. पोलिसांनी तातडीने शोध घेतल्याने ती पुन्हा आपल्या कुटुंबात परतू शकली़.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस