पाेलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले तरुणाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 20:53 IST2019-07-22T20:52:25+5:302019-07-22T20:53:18+5:30
आत्महत्या करीत असलेल्या तरुणाला पाेलिसांनी वाचविले. तरुणाच्या नातेवाईकांनी पाेलिसांचे आभार मानले.

पाेलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले तरुणाचे प्राण
कर्वेनगर : आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे पाेलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्री दाेनच्या सुमारास घडली. एक तरुण घरात आत्महत्या करीत असल्याचे पाेलिसांना समजताच पाेलीस तातडीने घटनास्थळी दाखल हाेत दरवाजा ताेडून तरुणाचे प्राण वाचविले.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका तीस वर्षीय तरुणाची आई रात्री दाेनच्या सुमरास वारजे पाेलीस स्टेशनमध्ये धावत येऊन तिचा मुलगा आत्महत्या करत असल्याचे पाेलिसांना सांगितले. गस्तीवर असणारे पाेलीस प्रतिक माेरे, देवा धाेंगडे, महेश भाेयणे, शेखर फाटक यांनी घटनास्थळी दाखल हाेत घराचा दरवाजा ताेडला. तसेच तरुण आत्महत्या करीत असलेली रस्सी कापून तरुणाची सुटका केली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
तरुणाचे प्राण वाचविल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी पाेलिसांचे आभार मानले. पाेलिसांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे त्यांच्यावर काैतुकाचा वर्षाव हाेत आहे. पुढील तपास वरिष्ठ पाेलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर करीत आहेत.