शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सिंहगड रस्त्यावर पोलिसांचे संचलन;‘भारत माता की जय’घोषणा देत नागरिकांकडून 'सॅल्यूट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 12:54 IST

कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

धायरी : कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त पसरू नये, ह्यासाठी नागरिकांनी आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, तसेच सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी ' शारीरिक अंतर ' पाळून दैनंदिन व्यवहार करावेत यासाठी सिंहगड रस्ता पोलिसांच्या वतीने शुक्रवारी प्रमुख रस्त्यांवरून 'सशस्त्र रूट मार्च' काढण्यात आला.यावेळी सकाळी नऊ वाजल्यापासून हिंगणे बुद्रुक येथून संचलनास प्रारंभ झाला. त्यानंतर  वडगांव बुद्रुक, जाधवनगर, नऱ्हे, तसेच सिंहगड रस्ता आदी परिसरात कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्ता पोलिसांच्या वतीने संचलन करण्यात आले.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे, बालाजी साळुंखे,अर्चना बोधडे, प्रशांत कणसे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे, नितीन जाधव यांच्यासह सीआयएफएस, सीआरपीएफ, एसआरपीएफ, तसेच पोलीस व होमगार्ड व सशस्त्र जवानांचा सहभाग होता. सिंहगड रस्ता परिसराला छावणीचे रूप आले होते. कोरोना विरुद्धच्या लढाईत पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या रूट मार्चने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी संचलनाचे नेतृत्व केले. संचालनासाठी आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नऱ्हे ग्रामपंचायतीचे सदस्य सुशांत कुटे, तेजस कुटे आदी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. संचलनासाठी एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस दिसल्याने बरेच नागरिक आपल्या मोबाईलमधून पोलिसांचे फोटो काढत होते, तर काही जण पोलिसांना 'सॅल्यूट' करत होते.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ' भारत माता की जय ' चा नारा दिला.

टॅग्स :DhayariधायरीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस