शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा! पळ काढण्याच्या प्रयत्नात तरुणीचा मृत्यू; आणखी एक जखमी

By किरण शिंदे | Updated: February 23, 2026 23:12 IST

संबंधित स्पा मध्ये देहविक्री सुरू असल्याचा संशय

किरण शिंदे, पुणे: पुण्यातील विमाननगर परिसरात रविवारी घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली. ‘द रूट्स स्पा’ या स्पा सेंटरवर पोलिसांच्या कारवाई दरम्यान एका तरुणीने आणि स्पा सेंटरच्या मॅनेजरने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानतळ पोलिसांच्या पथकाने दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकला. स्पा मध्ये सुरू असलेल्या संशयास्पद प्रकारांबाबत पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

कारवाईदरम्यान अटक होण्याच्या भीतीने एका तरुणीने आणि मॅनेजरने दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. उडी मारल्यानंतर दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र तरुणीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मॅनेजरच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. संबंधित स्पा मध्ये देहविक्री सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी व्यवस्थापक आणि मालकाविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितले की, महिलेच्या मृत्यूची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात येत आहे. तसेच स्पा सेंटरचे परवाने, कर्मचारी नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान घटना समजताच स्पा सेंटरच्या इमारतीभोवती मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि परिसरात बंदोबस्त वाढवला. सध्या या प्रकरणी स्पा सेंटरचे व्यवस्थापन, कर्मचारी तसेच अन्य संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून, तपासाअंती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Spa Raid: Woman Dies Trying to Flee; One Injured

Web Summary : A woman died and a manager was injured in Pune after jumping from a spa during a police raid. The spa was suspected of prostitution. Police are investigating the incident, including the spa's licenses and financial transactions, and have filed a case against the owner and manager.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याDeathमृत्यूPoliceपोलिसraidधाड