शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील लादेन टोळीविरोधात पोलिसांचा तडीपारीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 09:14 IST

लोणावळा शहरात खंडणी, हाणामारी, अवैध धंदे अशा पद्धतीनं धुमाकूळ घालत असलेल्या लोणावळ्यातील लादेन टोळीच्या मुसक्या आवळण्याची तयारी लोणावळा शहर पोलिसांनी सुरु केली असून त्यादृष्टीने पुरावे गोळा करत कलम 55 प्रमाणे तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले.

लोणावळा - लोणावळा शहरात खंडणी, हाणामारी, अवैध धंदे अशा पद्धतीनं धुमाकूळ घालत असलेल्या लोणावळ्यातील लादेन टोळीच्या मुसक्या आवळण्याची तयारी लोणावळा शहर पोलिसांनी सुरु केली असून त्यादृष्टीने पुरावे गोळा करत कलम 55 प्रमाणे तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले.

२०१५ साली लोणावळा शहरात भरदिवसा शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या जयचंद चौकात "लादेन" टोळीतील गुंडांनी धारदार चाकूने वार करून आनंद शिंगाडे या युवकाची हत्या केली होती, या गुन्ह्यातील सर्व साक्षीदार फितूर झाल्यामुळे या केसमधून लादेन टोळीचे सर्व आरोपी निर्दोष सुटून पुन्हा लोणावळ्यात आले. जेलमधून बाहेर सुटलेले आरोपी हे गप्प बसणार नाहीत, याबद्दल पोलिसांना खात्री होती, त्यामुळे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी या टोळीतील गुन्हेगाराची दहशत मोडून काढणेसाठी त्याचे विरुद्धच्या सर्व पुरावा गोळा करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- ५५ प्रमाणे प्रस्ताव तयार केला पण या प्रस्तावा साठी नागरिकांचे सुद्धा गोपनीय जबाब लागतात यासाठी जाधव यांनी लोणावळा शहरातील व्यापारी, सामाजिक कार्य करणारे लोक यांना पुढे होऊन जबाब देण्यासाठी आवाहन केले परंतु कोणीही पुढे आले नाही यावरून लोकांची मानसिकता दिसून येते.

जनतेच्या पोलीस खात्याकडून खूप अपेक्षा असतात, पण वेळ आल्यावर लोक योग्य मदतीसाठी पुढे येत नाहीत अशी खंत पोलीस प्रशासनाने व्यक्त केली. असे असले तरी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता लोणावळा पोलिसांनी या गुन्हेगार टोळीच्या मुसक्या अावळण्यासाठी तयारी केली आहे. ही टोळी कारागृहात होती त्यावेळी लोणावळा शहरात शांतता नांदत होती मात्र मागील काही दिवसांपासून शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  मागील आठवडाभरात या टोळीने शिवसेनेच्या नगरसेविका शादान चौधरी, उद्योजक प्रकाश हजारे यांच्यासह अन्य दोन व्यावसायकांकडे खंडणीची मागणी करत त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. याप्रकरणी चौधरी व हजारे यांच्या तक्रारीवरुन लादेन टोळीवर खंडणीचे दोन गुन्हे दाखल करत दोन जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणातील मुख्य तीन जण अद्याप फरार आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस