शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

पोलीस पाटलांनी वाचवले युवकाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 00:49 IST

तरुणाने केले होते विष प्राशन : वेळेत उपचारामुळे मिळाले जीवदान

मोरगाव : तरडोली (ता. बारामती) येथे पोलीस पाटील बाळासाहेब जाधव यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आसु सोनगाव येथील अनिल सोनलकर या युवकाला जीवदान मिळाले. विषारी औषध प्राशन केलेल्या या तरुणास अर्धा किमी पाठीवर उचलून रुग्णवाहिकेपर्यंत आणल्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले आहे.

आसु सोनगाव (ता. बारामती) येथील तरुण अनिल भगवान सोनलकर (रा. तरडोली, ता. बारामती) येथील राखीव वनक्षेत्रामध्ये विषारी औषध प्राशन केले होते. याबाबत, दि. १३ रोजी रात्री ७ वाजता माहिती वनसेवक भालेराव, भोसले यांना समजल्यानंतर रुग्णवाहिकेस बोलाविण्यात आले. घटनेची माहिती समजताच मोरगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवलदार राजेंद्र चव्हाण, पोलीस पाटील बाळासाहेब जाधव घटनास्थळी पोहोचले. हा तरुण मुख्य जिल्हा मार्गापासूनसुमारे अर्धा किमी ओढ्याशेजारी पडला होता.या ठिकाणी रस्ता नसल्याने रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती. विषारी औषध प्राशन केल्यामुळे तरुण अत्यावस्थेत पडला होता. तरुणास तत्काळ मदत न केल्यास जिवास धोका पोहोचू शकतो, असा विचार पोलीस पाटील जाधव यांच्या मनात आल्यानंतर, त्यांनी खांद्यावर तरुणास उचलून अर्धा किमी अंतरावर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत आणले.जाधव यांनी दाखविलेल्या तत्पुरतेमुळे आसु येथील तरुणाचे प्राण वाचले आहे. या तरुणावर मोरगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यातयेत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे