शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kidnapping: पोलीस असल्याचे सांगून गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्याचं केलं अपहरण; उकळली २ लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:01 IST

चोरट्यांनी २ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्यावर त्याची सुटका केली

पुणे : आम्ही क्राईम ब्रँच युनिट २ चे  पोलीस आहोत, तुम्ही ब्लँकने गॅस सिलिंडर विकता, तुमच्यावर केस करावी लागेल, असे सांगून गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉयचे अपहरण करुन चोरट्यांनी २ लाख रुपयांची खंडणी वसूल  केल्यावर त्याची सुटका केली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने तपास करुन तिघांना अटक केली आहे.

विकास बाबू कोडीतकर (वय ३०, रा. दत्तनगर, कात्रज), सतीष सुधीर वांजळे (वय३३), सुदर्शन किशोर गंगावणे (वय २५, रा. शिवशंकर सोसायटी, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच त्यांचा साथीदार मुकेश ऊर्फ मांगीलाल व इतर ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चतु:श्रृंगी मंदिरासमोर १५ मार्च रोजी दुपारी चार वाजता घडला होता.

याप्रकरणी श्रीराम भादू (वय २८, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी हे गॅस एजन्सीमध्ये टेम्पोतून सिलिंडरची डिलिव्हरी करतात. ते १५ मार्च रोजी दुपारी टेम्पो घेऊन चतु:श्रृंगी मंदिराजवळून जात असताना एक कार व मोटारसायकलवरुन ६ जण आले. त्यांनी टेम्पोला कार आडवी घालून त्यांना थांबविले. आम्ही क्राईम ब्रँच युनिट २ चे पोलीस आहोत, असे सांगून तुम्ही ब्लॅकने गॅस सिलिंडर विकता, तुमच्यावर केस दाखल करावी लागेल, असे सांगून त्यांना व त्यांचा साथीदार कैलास यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. त्यांना स्वारगेट परिसरात फिरविले. केस नको असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, नाही तर जेलची हवा खावी लागेल, असे सांगितले. त्यांना कारमध्ये मारहाण करुन तुमचे हातपाय तोडून जिवे मारुन टाकू अशी धमकी दिली. कैलाश याच्या शर्टचे खिशातील ४ हजार ५०० रुपये व मोबाईल काढून घेतला. त्या मोबाईलवरुन फिर्यादी यांच्या नातेवाईक व ओळखीच्या लोकांना फोन करुन पैशांची मागणी केली. भवरलाल यांच्याकडून २ लाख रुपये घेतल्यानंतर त्यांना सोडून दिले.

पोलीस पथकाने चौकशी करुन तिघांना अटक केली  याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले की, हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी हे गुन्हे शाखेच्या युनिट २चा शोध घेत आले. त्यांनी तुमच्या पोलिसांनी आपल्याला व साथीदाराला लुटल्याचे सांगितले़  हा प्रकार पूर्वी विश्वनाथ गॅस एजन्सीमध्ये काम करणारा व मालकांनी त्याला कामावरुन काढून टाकलेला मांगीलाल याने केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार आमच्या पथकाने चौकशी करुन तिघांना अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCylinderगॅस सिलेंडरPoliceपोलिसKidnappingअपहरण