शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Pune | पोलिसांच्या प्रसंगावधानाने खुनाचा कट उधळला; आरोपींची काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 10:55 IST

दोघांना ताब्यात घेतल्याने तरुणाच्या खुनाचा कट उधळला...

पुणे : दोन गटांत झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाच्या खुनाचा कट रचला होता. पण, ही बाब गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला समजल्यानंतर त्यांनी दोघांना ताब्यात घेतल्याने तरुणाच्या खुनाचा कट उधळला गेला. त्यांच्या तिसऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

समीर सलीम शेख (वय १९), शाहीद फरीद शेख (वय २६, दोघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून कुऱ्हाड, कोयता, दोन गुप्त्या, एक तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सलमान खान (रा. मोमिनपुरा) असे खुनाचा कट रचण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाची दुसऱ्या गटातील मुलांबरोबर वाद झाला होता. त्यावेळी सलमान याने मध्यस्थी करून तो मिटवला होता. त्या मुलाने नंतर आणखी एका गटासोबत वाद घातला. त्यावेळी त्याने सलमान हा आपला भाऊ असून, आपल्याला कोणी नडायचे नाही असा दम भरला. हा प्रकार सलमान याला समजल्यावर त्याने त्या मुलाला चांगलेच सुनावले. त्याचाच राग या मुलाला आला. त्याने समीर, शाहीद आणि आपल्या इतर दोघे अल्पवयीन साथीदार असे मिळून सलमान याच्या खुनाचा कट रचला.

आरोपींची धिंड...

दोघा आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची धिंड काढली. ज्या परिसरात ते गुन्हा करण्यासाठी एकत्र जमले होते. तेथून पोलिसांनी त्यांना रस्त्याने फिरवले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी