शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदार राम सातपुते यांच्या शाही लग्न सोहळ्याची होणार पोलीस चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 01:09 IST

शेकडो पोलिसांचा बंदोबस्त : तरीही कोरोना नियमांपासून अनभिज्ञ

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून एका बाजूला राज्यात २२ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी लावली जात असतानाच माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते त्यांचा अतिशय शाही थाटात झालेल्या विवाह समारंभात विरोधी पक्षनेत्यांसह हजोरा नेते कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावरुन सोशल मिडियावर आज दिवसभर सामान्यांना ५० लोकांची मर्यादा असताना राजकीय लोकांना कोणतेही बंधन नाही का अशी टीका होत होती. दरम्यान, याप्रकरणी सुरुवातीला शहर पोलीस दलानेही कानावर हात ठेवले होते. मात्र आता या शाही लग्न सोहळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

आमदार राम सातपुते यांचा विवाह शुभारंभ लॉन्समध्ये साजरा झाला. या लग्नाला पाहुण्यांची अलोट गर्दी झाली होती. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती. सामान्यांसाठी लग्नाला केवळ ५० पाहुण्यांना बोलावण्याची मुभा असताना व नियम मोडल्यास तात्काळ गुन्हे दाखल होत असताना आमदारांना नियमावली नाही का असा सवाल आता विचारण्यात येत आहे.

राम सातपुते यांच्या लग्नाला हजारो पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले होते. लग्न सोहळ्यातील फोटोमध्ये अनेक पाहुणे आणि नेते मंडळींनी तोंडाला मास्क लावला नसल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने गर्दी असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडाला. लग्नाला उपस्थित राहिलेले फडणवीस, दरेकर यांच्यापासून अनेक नेत्यांना पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे पोलीस बंदोबस्त होता, असे असूनही कोरोनाचा नियम मोडला जात आहे, याचे या राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र आता याप्रकरणी पोलीस चौकशी करण्यात येणार आहे. .

अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार

राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यातील कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. त्या सोहळ्यात संदर्भात अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, सहपोलीस आयुक्त........हे नेते होते उपस्थितदेवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, हर्षवर्धन पाटील, गिरीश बापट, सुभाष देशमुख, निलेश राणे यासारखे भाजपचे दिग्गज नेते लग्नाला उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनीही राम सातपुते यांच्या लग्नाही हजेरी लावली.......

टॅग्स :PuneपुणेMLAआमदारBJPभाजपाmarriageलग्नPoliceपोलिस