गोमांसचे वाहन अडविणारे पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:12 IST2018-08-14T01:11:43+5:302018-08-14T01:12:05+5:30
दिघी परिसरात बेकायदा गोमांस वाहतूक करणाऱ्या मोटारीला रविवारी रात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोमांस वाहतूक करणा-यांनी अडविण्यास आलेल्या दिघी पोलिसांच्या अंगावर मोटार घातली.

गोमांसचे वाहन अडविणारे पोलीस जखमी
पिंपरी - दिघी परिसरात बेकायदा गोमांस वाहतूक करणाऱ्या मोटारीला रविवारी रात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोमांस वाहतूक करणा-यांनी अडविण्यास आलेल्या दिघी पोलिसांच्या अंगावर मोटार घातली. त्यात एका पोलिसाच्या पायाला जखम झाली, तर दुसºयास किरकोळ मार लागला. दिघी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सुरेश शिंदे जखमी झाले.
गस्तीवरील पोलिसांनी गोमांस वाहतूक करणाºया मोटारीला अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने त्या पोलिसांच्या अंगावर मोटार घातली. त्यात पोलीस कर्मचारी शिंदे जखमी झाले. मोटार तेथेच सोडून पळून गेले.