शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

पोलिसांनी मिळवून दिला ज्येष्ठ नागरिकास सदनिकेचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 15:00 IST

दत्तवाडी पोलिसांनी अशाच एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या सदनिकेचा ताबा मिळवून देऊन दिलासा दिला आहे.

पुणे : जुन्या सहकारी गृहरचना संस्थेच्या पूर्नविकासाचे काम आता अनेक सोसायट्या घेऊ लागल्या आहेत. पण काही वेळा बांधकाम व्यवसायिक ताबा घेताना अनेक आश्वासने देतात, एकदा जागा ताब्यात आली की मुळ घरमालकांना करारप्रमाणे जागा देण्याचे टाळतात. त्यात ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना अधिकच त्रास होतो. दत्तवाडी पोलिसांनी अशाच एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या सदनिकेचा ताबा मिळवून देऊन दिलासा दिला आहे. अनेकदा पोलीस ठाण्यात अशा तक्रारी घेऊन गेल्यावर पोलीस त्या कागदांना हातही लावत नाही. ही दिवाणी बाब आहे, तुम्ही न्यायालयात जा असे सांगून हात झटकून टाकतात. दत्तवाडी पोलिसांचा आदर्श इतर पोलीस ठाण्यांनी घेतल्यास असंख्य नागरिकांना दिलासा मिळू शकतो. 

    रविकुमार सदाशिव भावे (वय ६७, रा़ बल्लाळ सोसायटी, पद्मावती, सहकारनगर) हे राहत असलेल्या सहकारी गृह संस्थेच्या पुर्नविकासाचा हक्क एका बांधकाम व्यावसायिकाला दिला होता. त्यांचा करार २०१४ मध्ये होऊन आॅक्टोंबर २०१७ ला रवीकुमार यांना सदनिका देणे अपेक्षित होते. पण, त्यांनी वर्ष उलटल्यानंतरही ताबा दिला नाही. भावे यांनी महाराष्ट्र सरकारच्या आपलं सरकार या पोर्टलवर तक्रार नोंदविली. ही तक्रार दत्तवाडी पोलिसांना १८ नोव्हेंबर २०१८ ला मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी देवीदास घेवारे यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर यांना तक्रारदारांना मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोघा संबंधितांना समोरासमोर बसवून समेट घडवून आणला.        बांधकाम व्यावसायिकाने दोन आठवड्यात भावे यांच्या सदनिकेची रंगरंगोटी आणि राहिलेली इतर छोटी मोठी कामे करुन दिली व भावे यांना सदनिकेचा ताबा दिला. बांधकाम व्यावसायिकांनी अंतर्गत सोयी सुविधा देण्याचे कबुल केल्यामुळे भावे यांनी सर्वात प्रथम ७ लाख रुपये देण्याचे ठरले होते. पंरतु भावे यांच्याकडून ९ लाख रुपये घेतले. तरीसुद्धा त्यांना ताबा मिळाला नव्हता. बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिना १६ हजार ५०० रुपये भाडे भावे यांना द्यायचे कबल करुनसुद्धा एप्रिल २०१६ पासून ती रक्कम देण्यात आली नाही. ती रक्कम तडजोडीमध्ये बांधकाम व्यावसायिक यांनी एकूण सव्वा लाख रुपये व पाच हजार रुपये  वाहतूकीचे भाडे म्हणून दिले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीस