शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

एका छोट्याशा ‘खुणे’वर पोलिसांनी शोधली चिमुरडीची हरवलेली वाट ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 6:50 PM

हडपसर येथील साधना शाळेत शनिवारी एक अनोळखी मुलगी येते. त्यानंतर चित्रपटातील कथानकासारखी कथा सुरु असल्यासारखा प्रसंग घडतो.

ठळक मुद्देशहरातील काही मुख्य वस्तू किंवा चौक हे शोध कार्यात किती महत्वाचे ठरतात हे निदर्शनास

- जयवंत गंधाले - हडपसर : हडपसरच्या गर्दीत ती हरवते, शाळेत जाते... शाळेत ही नवी कोण मुलगी आली म्हणून शिक्षक चौकशी करतात. शिक्षक पोलिसांना माहिती देतात. त्याच वेळी पेट्रोलिंग करणारे पोलीस तेथे जातात. पोलिसांना शिक्षक सांगतात या शाळेतील ही मुलगी नाही, ती रडत असते, तिला चक्कर येत असते. म्हणून रुग्णालयात उपचार करतात. ती केवळ गार्डन व वडील टेलरिंगचे काम एवढी छोटी ओळख पोलिसांना सांगते.आणि या ओळखीवर तिचा हरवण्याचा प्रवास संपतो..  हडपसर येथील साधना शाळेत शनिवारी एक अनोळखी मुलगी येते. त्यानंतर चित्रपटातील कथानकासारखी कथा सुरु असल्यासारखा प्रसंग घडतो. शहरातील काही मुख्य वस्तू किंवा चौक हे शोध कार्यात किती महत्वाचे ठरतात हे आज हडपसरमध्ये दिसून आले. हडपसर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस तिला विश्वासात घेऊन पत्ता तिचा शोधू लागतात. केवळ हडपसरमधील गार्डनजवळ एका टेलरिंगच्या दुकानात तिचे वडील काम करतात. एवढेच तिला माहिती होते. यावरून येथील पोलीस तिच्या वडिलांचा शोध घेतात.ती इकडे हरवली असताना तिच्या घरी परिस्थिती वेगळी असते. उरूळीकांचन येथील तिच्या घरी ती न दिसल्याने शोधाशोध सुरु होते. तेथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार तो पर्यंत हडपसर पोलिसांचा त्यांना फोन  जातो आणि तिचे घराचे सुटकेचा श्वास सोडतात. मुलगी त्यांच्या समोर येताच मुलीला मिट मारतात, कवटाळतात, त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. तिला चक्कर येते असल्याने तिला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेतात. विलास राठोड व युवराज कांबळे हे दोन पोलीस कर्मचारी  यांच्या प्रयत्नाने त्यामुलीला आपला परिवार मिळाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाने तिला तिच्या घरापर्यंत पोलिसांनी सुखरूप पोहचवले. आजचा हा तिचा प्रवास चित्रपटातील कथेसारखाच होता. पोलसांनी केलेल्या प्रयात्नांना यश आल्याने त्या परिवारात आज तिच्या जाण्याने एक आनंद निर्माण झाला आहे...............  

टॅग्स :HadapsarहडपसरPoliceपोलिस