Pune: बोपदेव घाटात लुटणाऱ्या तिघांना अखेर पोलिसांनी पकडले, ५ जबरी चोरीचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:01 PM2024-04-27T12:01:13+5:302024-04-27T12:01:52+5:30

पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत त्यांच्याकडून १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे...

Police finally caught the three who were robbing Bopdev Ghat, 5 forced thefts | Pune: बोपदेव घाटात लुटणाऱ्या तिघांना अखेर पोलिसांनी पकडले, ५ जबरी चोरीचा छडा

Pune: बोपदेव घाटात लुटणाऱ्या तिघांना अखेर पोलिसांनी पकडले, ५ जबरी चोरीचा छडा

पुणे : बोपदेव घाटात शस्त्राच्या धाकाने लुटमार करणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत त्यांच्याकडून १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये दोन दुचाकी, कोयते, सुरा आणि तीन मोबाईलचा समावेश आहे. साहिल अकबर बानेवाले (वय २१), गालीब बादशाह मेहबुब अत्तार (१९, रा. दोघे सिटी सेंटर रोड, उंड्री) आणि राहुल परवाराम गौतम (२१, रा. काळे पडळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

२१ एप्रिलला आशुतोष राज हा त्याचा मित्र आयान श्रीवास्तव, अनिकेत कुमार आणि आनंद राज याच्यासह बोपदेव घाटातील टेबल पॉईंटवर रात्री अडीचच्या सुमारास गप्पा मारत बसले होते. त्यांना तिघांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले. ऑनलाईन पैसे घेऊन पळ काढला. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस कर्मचारी शाहिद शेख आणि लक्ष्मण होळकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. बोपदेव घाटात लूटमार करणारे संशयित आरोपी लूटमार करण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानुसार दोन पथके तयार करून पोलिसांनी घाटात सापळा लावला. त्यावेळी दोन दुचाकीवरून आरोपी तेथे आले. त्यांनी गाडीत लपविलेली हत्यारे काढून पँटमध्ये खोचून ठेवली. त्यानंतर टेबल पॉईंटवर पाहणी करीत फिरू लागले. पोलिसांनी संशयित आरोपींना अचूक हेरले. पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे, गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, कर्मचारी सतीश चव्हाण, विशाल मेमाणे, नीलेश देसाई, गोरखनाथ चिकने, संतोष बनसुडे, सुजित मदन आणि सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली.

Web Title: Police finally caught the three who were robbing Bopdev Ghat, 5 forced thefts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.