शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना घटनेचे गांभीर्य नाही; महिलेने थेट न्यायालयात अर्ज केला अन् बलात्काराचा गुन्हा दाखल झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 20:42 IST

पुणे महानगपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल ; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी उचलले पाऊल

ठळक मुद्देतरूणीची आरोपी डॉक्टरशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती

पुणे : एक लग्न झालेले असतानाही परिचारिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणा-या महापालिकेच्या वैद्यकीय रूग्णालयातील एका डॉक्टरविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने फसवणुकीसंदर्भात यापूर्वी सिहंगड रस्ता आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली नाही, असे तरूणीचे म्हणणे आहे.

तेव्हा नाईलाजास्तव तरूणीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात वकिलामार्फत  तक्रार अर्ज दाखल केला आणि पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयाने स्वारगेट पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला. 

डॉ. शशिकांत सोरटे (वय 39 रा.शिवाजीनगर गणेशखिंड) असे गुन्हा दाखल केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2016 ते 2021 दरम्यान घडला. तरूणीची आरोपी डॉक्टरशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख  झाली. त्याने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती स्वीकारल्यानंतर त्याने तिचा मोबाईल क्रमांक मागितला. दोघांमध्ये ओळख वाढत गेली. तो तिला मला तू खूप आवडतेस आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे वारंवार म्हणू लागला. तिला तो रूग्णालयाच्या रूममध्ये बोलावू लागला. तिच्याशी जबरदस्तीने त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आपण लग्न करणार आहोत असे सांगून त्याने शारीरिक संबंधावेळी त्यांचे व्हिडिओ काढले. एके दिवशी फोनवर बोलत असताना तिला मागून एका बाईचा आवाज आला त्यानंतर ती त्याच्या घरी जाऊन धडकली. तेव्हा त्याने माझे लग्न पाच वर्षांपूर्वी झाले असून, मला 3 वर्षांचा मुलगा असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून कुठेही वाच्यता न करू नको असा तिच्यावर दबाव टाकला जात होता. तिच्याशी प्रेमाचे खोटे नाटक करून, युपीएससीची परीक्षा झाल्यावर लग्न करू असे आश्वासन देऊन वेळोवेळी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करून मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.

न्यायालयाने तिच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता अँड सिध्देश एस. घोडके  यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांना अँड गोविंद शर्मा व अँड अभिषेक नागरगोजे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाArrestअटकPoliceपोलिस