शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळातही लोकांची तलफ काही सुटता सुटेना, तंबाखू,सिगारेटवरील कारवाई थांबता थांबेना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 16:54 IST

शिवणे परिसरात तब्बल १४ लाख ४१ हजार रूपयांचे सिगारेट व तंबाखू जप्त

ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट एकची कारवाई तीन सुझुकी कारमध्ये मोठ्या प्रमाणात सिगारेट व तंबाखू विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून

पुणे : लॉकडाऊनच्या दरम्यान हातभट्टी दारू, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ यांच्या बेकायदेशीर विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील छुप्या पद्धतीने अनेकजण त्याची विक्री करताना दिसत आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. शिवणे परिसरात तीन कारमधून तंबाखू व सिगारेटची विक्री करणाऱ्या व त्यांना मालाचा पुरवठा करणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.रोहित सिताराम प्रजापती (वय २३, रा.महाल्क्षमी कॉम्पलेक्स, शिवणेगाव), विजय सिताराम प्रजापती (वय २५), पंकज शिवनारायण प्रजापती (वय २२) आणि मुकेश पारसमल छाजेड वय (वय ४०, सर्वजण रा. सहकारनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रजापती हा मालाचा पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे.

गुन्हे शाखा युनीट एकचे पोलिस नाईक सचिन जाधव यांना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीची माहिती मिळाली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरुण वाईकर यांच्या पथकाने शिवणे येथील महालक्ष्मी कॉम्लेक्स छापा टाकला. त्यावेळी तीन सुझुकी कारमध्ये मोठ्या प्रमाणात सिगारेट व तंबाखू विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. या ठिकाणा तीन आरोपींना अटक करत तब्बल १४ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना या मालाचा पुरवठा प्रजापती करत असल्याचे समजले. त्यानुसार त्याला देखील अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या विरोधात सिगारेट, तंबाखू कारसह पुढिल कारवाई करीता उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. आरोपींनी हा माल कोठून आणला आहे, याचा उत्तमनगर पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCigaretteसिगारेट