नागरिकांना गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:10 IST2021-03-07T04:10:26+5:302021-03-07T04:10:26+5:30
नवनीत मधुकर नाईक (वय ४०) व स्मिता उर्फ प्रिया नवनीत नाईक (३६) रा. विजयनिवास, रेड्डीजचाळ, टेंभीपाडारोड, शिवाजीनगर, भांडूप, पश्चिम ...

नागरिकांना गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीला पोलीस कोठडी
नवनीत मधुकर नाईक (वय ४०) व स्मिता उर्फ प्रिया नवनीत नाईक (३६) रा. विजयनिवास, रेड्डीजचाळ, टेंभीपाडारोड, शिवाजीनगर, भांडूप, पश्चिम मुंबई या नवरा-बायकोला (बंटी व बबली) सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
भोर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोर शहरातील विद्यानगर येथील बाळासो सखाराम तारू यांच्या घरात ३१ डिसेंबर २०१९ पासून ७ जानेवारी २०२० दरम्यान
सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ३ लाख ७६ हजार ७०९ रु माल चोरीला गेला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी नवनीत नाईक व प्रिया नाईक बारामती पोलिसांनी दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केली होती. त्या वेळी त्यांनी भोर शहरातील चोरीची कबुली दिल्याने त्यांना भोर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज पोलिसांनी भोर येथील न्यायालयात हजर केले असता त्याना २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तपास जमादार सुभाष
गिऱ्हे करीत आहेत.