शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

शिरुरमध्ये लाचखोर पोलीस कॉन्स्टेबलचे सिनेस्टाईल पलायन; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 19:07 IST

पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र केशव मांडगे यांच्यावर लाचलुचपत विभागाने, लाच स्वीकारल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत खात्याच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करूनही, मांडगे मात्र पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे.

ठळक मुद्देकलम ३५३, २७९ सह भ्रष्टाचार प्रतिबंध कलमांतर्गत गुन्हा दाखलजितेंद्र मांडगे अवैध धंदेवाल्यांना खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन उकळत असे पैसै

टाकळी हाजी : शिरूर पोलीस ठाण्यामधील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र केशव मांडगे यांच्यावर लाचलुचपत विभागाने, लाच स्वीकारल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत खात्याच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करूनही, मांडगे मात्र पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे.याबाबत लाचलुचपत खात्याचे पोलीस निरीक्षक अरुण दत्तू घोडके यांनी मांडगे यांच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्याला लाच स्वीकारणे, तसेच शासकीय कामात अडथळा आणून पळून जाणे, असा कलम ३५३, २७९ सह भ्रष्टाचार प्रतिबंध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी फिर्यादीमध्ये दिलेल्या माहितीनुसार : सुनील अशोक घावटे (रा. पाषाणमळा, शिरूर) भीमा नदीवर रांजणगाव सांडस येथे वाळू काढत होते. त्यांचा ट्रॅक्टर पोलीस कॉन्स्टेबल मांडगे यांनी पकडला होता. त्यानंतर मला प्रत्येक महिन्याला पंचवीस हजार रुपये दे. नाही तर तुझी तक्रार तहसीलदारांना करून, तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी देत होते. त्यामुळे घावटे यांनी खोट्या तक्रारीच्या भीतीने १८ हजार ५०० रुपये देण्याची तडजोड केली. मात्र मांडगेच्या सततच्या त्रासामुळे घावटे यांनी लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी तक्रारदारांसह पोलीस कॉन्स्टेबल व अधिकाऱ्यांना घेऊन शिरूरबाहेरून जाणाºया पुणे-नगर रस्त्यावर बायपास येथील एचपी पेट्रोल येऊन थांबले. तक्रारदार घावटे यांनी फोन करून मांडगेंना बोलावून घेतले.मांडगे स्विफ्ट गाडी (एमएच १२ पीटी ५१५१) या गाडीतून येऊन घावटे यांच्याकडून पेसे घेतले. मात्र सापळा रचल्याचे लक्षात येताच त्यांनी धूमस्टाईलने गाडी पळविली. त्यांचा पाठलाग अधिकाऱ्यांनी केला, मांडगेला विद्याधामजवळ अडून गाडी थांबबा, असे सांगितले. अधिकारी गाडीची चावी काढून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच मांडगेनी सिनेस्टाईल गाडी पळून नेण्यात यशस्वी ठरला. मात्र याबाबत पुरावे असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण घोडके करीत आहेत.शिरूरमधील मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाळूतस्करी व अवैध धंद्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला. गेल्या आठवड्यात टाकळी हाजी पोलिसांनी पकडलेल्या पाच वाळूचे ट्रक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर सोडून देण्यात आले. त्या वाळूतस्करांची बिदागी मांडगेच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. मांडगे याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. तो अवैध धंदेवाल्यांना खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन पैसै उकळत असे, अशी चर्चा आहे. एका जेसीबीकडून २५ हजार, तर ट्रककडून पाच हजार याप्रमाणे कार्ड असून, तालुक्यातील सर्व नद्या, ओढे हे पैसे कमाविण्याचे अड्डाच झाला होता. तालुक्यात सध्या ५०ते ६० ठिकाणी उपसा सुरू असून, रोज शेकडो ट्रक वाळूवाहतूक होती. यांची वसुली मांडगेमार्फतच चालत असल्याची चर्चा आहे. मांडगे यांनी लाखो रुपये महिन्याला घेऊन ते कोणा-कोणापर्यंत पोहोचते होतात, याची चौकशी होण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे. मांडगे यांच्या फोनमधील कॉल डिटेल्स घेतल्यास, पोलीस खात्याबरोबरच महसूलशी असलेली सलगीही उघड होऊ शकते, अशी चर्चा पोलीस व महसूलमध्ये रंगली आहे.

पोलिसांच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह...शिरूर तालुक्यात वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने मांडलेली अवैध धंद्याबाबत सत्यता दिसू लागली आहे. कॉन्स्टेबल मांडगेवर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यात या चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस