शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'मी कुणालाच हे काम करू देणार नाही', पुण्यात पोलीस हवालदाराची थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 21:21 IST

या प्रकरणाने पोलीस दलात खळबळ उडाली आहे...

पुणे : पुण्यातील नामवंत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दोन अधिकाऱ्यांमध्ये "मलईवरून" झालेल्या वाद जगजाहीर झाल्यानंतर आता याप्रकरणातल्या बंद दाराआड पण सर्वांसमक्ष घडलेल्या धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. कलेक्टरने या पोलीस ठाण्यातील थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना मलई गोळा करण्यावरून खडेबोल सुनावल्याचे आता समोर आले आहे. मलई गोळा करण्यावरून धुसफूस सुरू झाल्यानंतर त्याने "मी कुणालाच हे काम करू देणार नाही" अशी धमकीच वरिष्ठ दिली होती. याप्रकरणात आता संबंधित कर्मचाऱ्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबन केले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. श्रीधर जनार्दन पाटील असे निलंबित केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. 

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्यात मलईवरून वादावादी झाल्याचे प्रकरण घडले होते. त्यानंतर हे प्रकरण अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर गेले होते. तर पोलीस दलात देखील याची जोरदार चर्चा झाली होती. तत्पूर्वी याप्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पोलीस ठाण्यात असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाचे उचल बांगडी केली. तर नुकतीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची देखील उचलबांगडी करत विशेष शाखेत त्यांची बदली करण्यात आली. 

दरम्यान याप्रकरणात आता खात्याअंतर्गत चौकशी केल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मलईवरून पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यामध्येही धुसफूस सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. कारण, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाटील याच्याकडून अवैध धंद्याची वसुली बंद केल्यानंतर नाराज झालेल्या पाटील यांनी थेट " मी कुणालाच हे काम करू देणार नाही"  अशी धमकीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

त्यावरून हद्दीत अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत त्यांच्याकडून वसुली करत असल्याचे सिद्ध होत आहे. तर पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये देखील वाद झाले. ते वाद सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर झाले असल्याचे चौकशीतुन समोर आले आहे. त्यामुळे हे निलंबन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी