शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Pune Police: पोलिस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; पुणे शहरातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 11:16 IST

शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती...

पुणे : पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या पोलिस शिपायाने घराच्या टेरेसवरील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैभव दिलीप शिंदे (वय २९, रा. खेरे कॉलनी, लोहगाव) असे या पोलिस शिपायाचे नाव आहे.

वैभव शिंदे यांच्या मागे आई, पत्नी कांचन, भाऊ विजय आणि चार वर्षाचा मुलगा आहे. वैभव शिंदे हे पोलीस पोलीस दलात मोटार परिवहन विभागात नियुक्तीला होते. शिंदे हे पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परिक्षेची तयारी करत होते. शिंदे यांच्या घराजवळ चिंचेचे झाड आहे. छतावर झाडाची फांदी आलेली आहे. शिंदे यांनी शुक्रवारी पहाटे या फांदीला टॉवेल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली.

शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी पत्नी कांचन मला माफ  कर. भाऊ आणि आई मला माफ करा. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. भाऊ विजय याने पत्नीशी विवाह करावा, असे शिंदे यांनी चिठ्ठीमध्ये इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी