आकार मित्र मंडळाकडून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:22 IST2017-09-08T02:21:02+5:302017-09-08T02:22:38+5:30

पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत शहरातील आणि उपनगरातील पोलीस सुरक्षा व्यवस्था अतिशय उत्तमपणे राबविण्यात आली.

Police Commissioner Rashmi Shukla felicitated by the shape friend board | आकार मित्र मंडळाकडून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला सत्कार

आकार मित्र मंडळाकडून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला सत्कार

कर्वेनगर : पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत शहरातील आणि उपनगरातील पोलीस सुरक्षा व्यवस्था अतिशय उत्तमपणे राबविण्यात आली. मंडळांकडूनही पोलिसांना सहकार्य लाभले. त्यामुळे या वर्षी विसर्जनात उत्सवाला कोणतेही गालबोट लावले गेले नाही. तसेच २८ तास विसर्जन मिरवणूक शांततेत आणि भक्तीमय वातावरण पार पडली.
त्याचे नियोजन आणि शिस्तबद्ध रचना पोलीस आयुक्तांनी केली होती. त्याची दखल घेत आकार मित्र मंडळाकडून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना शाल श्रीफळ तसेच गणेश प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी मडंळाचे अध्यक्ष सचिन फोलाणे, महेंद्र कडू, धीरज अरगडे, नितीन गावडे, बंदी निढाळकर, मकरंद करबुर्गी, कमलेश जगताप या कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Police Commissioner Rashmi Shukla felicitated by the shape friend board

टॅग्स :Puneपुणे