शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

बंदी असतानाही बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांकडून पोलिसांना धक्कबुक्की; १२ जणांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 14:33 IST

भारती विदयापीठ पोलिसांची कारवाई; कात्रज येथील गुजरवाडी बाबर मळा येथील डोंगराचे बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर शनिवारी सकाळी घडला हा प्रकार

ठळक मुद्देबैलांना गाड्यांना जोडून, त्यांना निर्दययीपणे मारहाण करुन त्यांच्या शेपट्या पिरगाळून त्यांना जबरदस्तीने आरडा ओरडा करत पळवून निर्दयतेने वागवले

पुणे : उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानाही बैलगाडा शर्यत आयोजित करुन तिला प्रतिबंध करणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍या १२ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनीअटक केली आहे.

संतोष अशोक ननवरे (वय ४४, रा. गोकुळनगर, कोंढवा), योगेश बाळासाहेब रेणुसे (वय २९, रा. नेरावणे, ता. वेल्हा), मयुर दिलीप शेवाळे (वय २६, रा. शेवाळवाडी, देवाची ऊरळी), पंढरीनाथ जगन फडके (वय ५५, रा. नेरे, ता़ पनवेल), हरिश्चंद्र भागा फडके (वय ५२), पदमाकर रामदास फडके (वय ३८), ऋषीकेश सूर्यकांत कांचन (वय २३, रा. ऊरुळी कांचन), संकेत शशिकांत चोरगे (वय २१, रा. भेलकेवाडी, ता. भोर), यश राजू भिंगारे (वय १९), संतोष शिवराम कुडले (वय ४१), राहुल प्रकाश चौधरी (वय ३४, रा. वारजे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार कात्रज येथील गुजरवाडी बाबर मळा येथील डोंगराचे बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर शनिवारी सकाळी घडला. 

याप्रकरणी पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांनी फिर्याद दिली आहे. उच्च न्यायालय व राज्य शासनाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली असतानाही पंढरीनाथ फडके यांनी एकाच्या मदतीने बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले. लोकांना जमविले. बाबरमळा येथे बैलांना गाड्यांना जोडून, त्यांना निर्दययीपणे मारहाण करुन त्यांच्या शेपट्या पिरगाळून त्यांना जबरदस्तीने आरडा ओरडा करत पळवून निर्दयतेने वागवले.

त्यावेळी पोलीस आयोजक व सहभागी होणार्‍या इतरांना बैलगाडा शर्यती बेकायदा असल्याचे सांगत होते. तरी त्यांनी फिर्यादी पोलिसांशी वाद विवाद करुन त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला. शर्यतीमधील एक बैल व एक छकडा असे पळवून लावले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार