शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ लाखांची लाच मागणार्‍या पोलीस उपविभागीय अधिकार्‍यासह तिघांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 18:03 IST

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जालन्यात कारवाई

ठळक मुद्दे२ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुणे: जालना येथे अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती ३ लाख रुपये ठरल्यानंतर त्यापैकी २ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून उपविभागीय पोलीस अधिकारी व दोन पोलीस कर्मचार्‍यांना जालना येथे पकडले़.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर अशोक खिराडकर (वय ४५, रा. जालना) आणि पोलीस नाईक संतोष निरंजन अंभोरे (वय ४५, रा. कदिम पोलीस ठाणे, जालना) व पोलीस काँस्टेबल विठ्ठल पुंजाराम खार्डे (नेमणूक एस. डी. ओ. जालना कार्यालय, रा. कडवंचीवाडी, ता जि़. जालना) अशी त्यांची नावे आहेत.

जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यभार पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्याकडे आहे. जालना येथील पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिराडकर याने संतोष अंभोरे व विठ्ठल खार्डे यांच्यामार्फत ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार करण्यात आली. कारवाईची गुप्ता राखण्यासाठी पुण्यातून पथक पाठविण्यात आले.

पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, काँस्टेबल किरण चिमटे, दिनेश माने यांचे पथक जालनाला पोहचले. त्यांनी १८ व १९ मे रोजी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात तडजोडीअंती ३ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार त्यातील पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये देण्यात येणार होते. पोलिसांनी तक्रारदार याच्या घरी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पोलीस नाईक संतोष अंभोरे हा तक्रारदार यांच्या घरी आल्यावर २ लाख रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. सापळा कारवाई यशस्वी होताच इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून खिराडकर यांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकJalanaजालना