शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्रिशुल’ चित्रपट स्टाईलप्रमाणे कंपनीची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 22:04 IST

विश्वासघात व फसवणूक करुन ३५ ते ५० लाख रुपयांचा केला अपहार

ठळक मुद्देसिंहगड रोड पोलिसांनी या व्यवस्थापकाला केली अटक

पुणे : संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा गाजलेला ‘त्रिशुल’ चित्रपट सर्वांना माहिती असेल़ त्यात अमिताभ बच्चन संजीव कुमार याच्या कंपनीतील अधिकाऱ्याला फोडून त्याच्याकडून टेंडरची माहिती घेत व त्याच्यापेक्षा १ रुपया कमी किंमतीचे टेंडर भरुन ते काम मिळवत असे़ असा काहीचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. फक्त येथील एका अधिकाऱ्याने आपल्याच पत्नीच्या नावावर दुसरी कंपनी स्थापन करुन तो काम करत असलेल्या कंपनीपेक्षा कमी किंमतीचे टेंडर भरुन काम मिळविल्याचे उघड झाले आहे. सिंहगड रोड पोलिसांनी या व्यवस्थापकाला अटक केली आहे. प्रविण पुरुषोत्तम शेंडे (रा. श्रमिकनगर, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.याप्रकरणी सुनिल चांदोरकर (वय ४७, रा़ सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदोरकर यांचे त्रिमुर्ती स्टेनलिंक इक्विपमेंटस या नावाची कंपनी आहे. त्यात प्रविण शेंडे हे व्यवस्थापक या पदावर काम करीत होते. त्यांच्याबरोबर कंपनीने नॉन डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट (कंपनीची गुप्त व महत्वाची माहिती प्रसिद्ध व उघड न करण्याबाबतचा करार) तसेच नोकरीच्या कालावधीत पालन करावयाच्या अटी व शर्तीचा घोषवारा याचा करार झाला होता. असे असताना शेंडे याने आपल्या पत्नीच्या नावाने एस़ एम़ इंजिनिअर्स अँड ट्रेडर्स, श्रीमीरा ट्रान्सपोर्टेशन ट्रेडर्स या कंपन्या स्थापन केला. चांदोरकर यांचे कंपनीपेक्षा ग्राहकांना हव्या असलेल्या मालाचे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांचे कंपनीपेक्षा कमी किंमतीत त्यांचे कंपनीचे कोटेशन पुरवून त्याच्या साथीदारामार्फत माल पुरविला़ तसेच चांदोरकर यांचे कंपनीस तोटा होऊन त्यांचे स्वताचा आर्थिक फायदा होईल, या उद्देशाने कंपनीच्या मेल आयडीवरुन स्वत:च्या मेल आयडीवर चांदोरकर यांच्या कंपनीची माहिती ट्रान्सफर करुन फिर्यादी यांचा विश्वासघात व फसवणूक करुन ३५ ते ५० लाख रुपयांचा अपहार केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत सुरु होता़ सिंहगड रोड पोलिसांनी प्रविण शेंडे यांना अटक केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक