कवयित्री अरुणा ढेरे आणि अभिनेते मोहन जोशी यांना 'वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव' पुरस्कार जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 07:24 PM2020-12-17T19:24:32+5:302020-12-17T19:24:58+5:30

दरवर्षी साहित्यिक कलावंत संमेलनात कला आणि साहित्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जातो.

Poet Aruna Dhere and Actor Mohan Joshi announced the 'Vagyajne' award | कवयित्री अरुणा ढेरे आणि अभिनेते मोहन जोशी यांना 'वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव' पुरस्कार जाहीर 

कवयित्री अरुणा ढेरे आणि अभिनेते मोहन जोशी यांना 'वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव' पुरस्कार जाहीर 

googlenewsNext

पुणेः- साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यंदाचा वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉ.अरूणा ढेरे  आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दि. 25 आणि 26 डिसेंबर रोजी 20 वे साहित्यिक कलावंत संमेलन होत आहे. शनिवारी ( 26 डिसेंबर) रोजी दुपारी ४ वाजता ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी कळविली  आहे.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी साहित्यिक कलावंत संमेलनात कला आणि साहित्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या दोन व्यक्तींना स्व. रमेश गरवारे स्मरणार्थ वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

यापूर्वी हृदयनाथ मंगेशकर, कवी ग्रेस, यशवंत देव, सुलोचना चव्हाण, श्रीनिवास खळे, डॉ.गिरीश ओक, जगदीश खेबुडकर, अभिनेते सयाजी शिंदे, डॉ.अच्युत गोडबोले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा मोहन जोशी व डॉ.अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. 
 

ज्येष्ठ कवयित्री आणि 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे  यांनी कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित आणि बालसाहुित्यात विपूल लेखन केले आहे. त्यांची जवळपास 40 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर  मोहन जोशी यांनी 250 मराठी चित्रपट, 350 हिंदी चित्रपट, 50 मालिका आणि 48 नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

Web Title: Poet Aruna Dhere and Actor Mohan Joshi announced the 'Vagyajne' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.