शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीएने वेल्ह्यातील जोडरस्त्यांची कामे करावी : संग्राम थोपटे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 18:58 IST

‘पीएमआरडीए विकासाच्या दृष्टिकोनातून नेमके काय करते याची माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तळागाळाच्या जनतेपर्यंत विकासकामे पोहचत आहेत.

ठळक मुद्देपीएमआरडीएच्यावतीने लाभार्थ्यांसाठी वेल्ह्यात कार्यशाळा  

पुणे/मार्गासनी : पंतप्रधान आवास योजना उत्कृष्ट आहे. वेल्हे तालुक्यात होणाऱ्या घरकुलांसाठी एक कार्यशाळा राबविण्यात यावी. त्याचप्रमाणे गायरान जागा विकासासाठी शासनाने उपलब्ध करून द्याव्यात. वेल्हे जोड रस्त्यांची कामे पीएमआरडीएच्या माध्यमातून राबविली जावीत, असे मत आमदार थोपटे यांनी व्यक्त केले. वेल्हेतील कोंढावळे येथे पुणे प्रादेशिक प्राधिकरणने कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी आमदार संग्राम थोपटे, पंचायत समिती सभापती संगीता जेधे, उपसभापती दिनकर सरपाले, पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक, पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, गटविकास अधिकारी मनोज यादव, तहसीलदार प्रदीप उबाळे, माजी पंचायत समिती सभापती सीमा राऊत, सरपंच, उपसरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.आमदार संग्राम थोपटे म्हणाले, ‘पीएमआरडीए विकासाच्या दृष्टिकोनातून नेमके काय करते याची माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तळागाळाच्या जनतेपर्यंत विकासकामे पोहचत आहेत. शहरी आणि ग्रामीण भाग जोडण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. पीएमआरडीए हे नियोजन करणारे प्राधिकरण आहे.मिलिंद पाठक म्हणाले की, वेल्हा तालुक्यात रहिवासी नसलेले नागरिक विनापरवानगी सदनिका बांधण्याचे काम करीत आहेत. अनधिकृत बांधकामांना आळा बसायला हवा. नागरिकांनी बांधकाम परवानगी घेऊन घरे बांधणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकामांची माहिती तहसीलदार, ग्रामसेवक व पोलीस पाटलांनी वेळोवेळी पीएमआरडीएला द्यावी.नागरिकांच्या सोयीसाठी नसरापूर येथे लवकरच पीएमआरडीएचे कार्यालय होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही आर्थिक दुर्बल घटकांसाठी फायदेशीर व परवडणारी आहे. त्यासाठी अनुदान कशा स्वरूपात उपलब्ध होणार आहे. याविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून वेल्हा ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.  

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएcongressकाँग्रेसKiran Gitteकिरण गित्ते