शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे व पिंपरी महापालिकांप्रमाणे 'पीएमआरडीए'नेही 'पीएमपीएल'ला संचलन तूट द्यावी: लक्ष्मीनारायण मिश्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 21:49 IST

पीएमपीच्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली आणि डिजिटल माध्यमाद्वारे काम केले जाणार

ठळक मुद्देबससेवेचा विस्तार ग्रामीण भागात झाल्याने मागणी

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका ज्याप्रमाणे 'पीएमपीएमएल'ला संचलन तूट देतात, त्याप्रमाणे पुणे महानगर क्षेत्र विकास विकास महामंडळानेदेखील संचलन तूट द्यावी. पीएमपीच्या बससेवेचा विस्तार पीएमआरडीएच्या हद्दीपर्यंत झाला आहे. त्याला संचालक मंडळाने मान्यताही दिलेली आहे. त्यानूसार महामंडळाने पीएमआरडीएच्या हद्दीत बस मार्ग देखील सुरू केले असून संचलन तूट देण्याविषयी पीएमआरडीएशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, पीएमआरडीएकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

'पीएमपीएल'च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बुधवारी(दि.१४) पत्रकारांशी बुधवारी संवाद साधला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरूरे, वाहतूक व्यवस्थापक (प्रभारी) दत्तात्रय झेंडे, जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) सतीश घाटे उपस्थित होते. 

मिश्रा म्हणाले, प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली आणि डिजिटल माध्यमाद्वारे काम केले जाणार आहे. प्रवाशांना मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे बस प्रवासामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती मिळणार आहे. या सुविधेद्वारे प्रवाशांना त्यांच्या मार्गावरील बसचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे. उत्पन्न वाढीसाठी देखील डिजिटल जाहिरातीवर भर देण्यात येणार असल्याचे मिश्रा म्हणाले.  मिश्रा यांनी पीएमपीच्या सर्व विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. महामंडळाची बससंख्या, कोरोनामुळे बसलेला फटका, सद्यःस्थितीमध्ये सुरू असलेल्या बस याची माहिती घेतली.------/------मिश्रा म्हणाले...१. बसचे लाईव्ह लोकेशन ते बसमध्ये प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढण्यापर्यंतची ऑनलाईन सुविधा देणार.२. महामंडळाकडून देण्यात येणार्‍या इतर सोयी - सुविधा ऑनलाईन करणार.३. खासगी वाहनांचा वापर कमी करून नागरिकांना  सार्वजनिक वाहतूकीकडे वळविण्यासाठी नियोजन.४. संचलन तूट येण्याची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यावर काम करणार.

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएPMPMLपीएमपीएमएलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका