शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘पीएमपी’ ची बीआरटी मार्गांवरील आयटीएमएस यंत्रणा कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 12:29 IST

पीएमपीकडून बीआरटी मार्गांवर बस संचलनासाठी सुरू करण्यात आलेली इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा कोलमडून गेली आहे.

ठळक मुद्देपीएमपीच्या ६९८ बसमध्ये आयटीएमएस यंत्रणाबीआरटी स्थानकातील एलईडी यंत्रणा बंद

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)कडून बीआरटी मार्गांवर बस संचलनासाठी सुरू करण्यात आलेली इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) ही यंत्रणा कोलमडून गेली आहे. एकुण ६९८ बसपैकी अनेक बस या यंत्रणेमध्ये दिसतच नसल्याचे समोर आले आहे. सर्व बीआरटी स्थानकातील एलईडी यंत्रणा बंद पडली आहे.पीएमपीच्या ६९८ बसमध्ये आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे बीआरटी बसमार्गावरील बसची प्रवाशांना अचूक माहिती देणे, मार्गावरील बसचा वेग नियंत्रण कक्षामार्फत नियंत्रित करणे, चालकाशी प्रत्यक्ष संपर्क साधणे, बसथांब्यांची उद्घोषणा करणे, बस वेळेवर धावण्याबाबत कक्षाकडून नियंत्रण करणे असे विविध फायदे आहेत. पण सध्या यापैकी एकही हेतु साध्य होताना दिसत नाही. या यंत्रणेच्या देखभाल-दुरूस्तीचे काम एनईसी या संस्थेकडे देण्यात आले आहे. मात्र, फेब्रुवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत संस्थेने काम केलेले नाही. त्यामुळे ६९८ पैकी दररोज सरासरी केवळ ३५० बसचा अहवाल होत असून सरासरी केवळ ३० बसचे मार्ग निवडले जात आहेत. दि. २२ मार्च पासून बीआरटी मार्गावरील सर्व बसस्थानकातील एलईडी यंत्रणा बंद पडली आहे. बसमधील एलईडीवर दिसणारे बस स्थानक आणि प्रत्यक्षातील बस स्थानकामध्ये तफावत आढळून येते. याबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी पीएमपीकडे आल्या आहेत. यंत्रणा दुरूस्त करण्यासाठी साहित्य उपलब्ध नसून ते २ ते ५ महिन्यांनी मिळेल, असे एनईसीने लेखी कळविले असल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.मार्गावर प्रत्यक्षात धावलेल्या बसचे किलोमीटर व एनईसीच्या अहवालातील किलोमीटर यामध्ये तफावत आढळून येते. अहवालांमधून अपुरी माहिती मिळत आहे. सॉफ्टवेअर माहिती प्रत्यक्षातील माहितीशी जुळत नाही. मोबाईल अ‍ॅप पुर्ण क्षमतेने कार्यरत नाही. याबाबत एनईसीला वेळोवेळी कारणे दाखवा नोटीसही देण्यात आले आहे. यंत्रणेत सुधारणा होत नसल्याने संस्थेचे बील देण्यात आलेले नाही. करारातील तरतुदीनुसार यंत्रणेत सुधारणा केल्यास थकीत बिल दिले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे