शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

पीएमपीच्या ई-बसची निविदा प्रसिध्द  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 7:06 PM

देशात कोणत्याही शहरात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-बस घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पुणे हे पहिले शहर ठरणार आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत एकुण ५०० इलेक्ट्रिक बस घेतल्या जाणार जानेवारी महिन्यात पहिल्या २५ ई-बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील अशी अपेक्षानवीन वर्षातील सहा महिन्यात सर्व बस पीएमपी मिळणार असल्याची माहिती

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मंगळवारी (दि. १८) वातानुकूलित ई-बसची निविदा प्रक्रिया सुरू केली. गणेशोत्सवाच्या काळात ई-निविदा प्रसिध्द करून प्रशासनाने या प्रक्रियेचा प्रारंभ केला. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत एकुण ५०० इलेक्ट्रिक बस घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५० बसेससाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३५० बस घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये २५ बस नऊ मीटर नॉन बीआरटी व १२५ बस १२ मीटर बीआरटी बसचा समावेश आहे. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट बेसिस (जीसीसी) तत्तावर या बस घेण्याचे नियोजन आहे. याची निविदा मंगळवारी प्रसिध्द करण्यात आली असून दि. ९ आॅक्टोबरपर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. दरम्यान, देशात कोणत्याही शहरात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-बस घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पुणे हे पहिले शहर ठरणार आहे. जानेवारी महिन्यात पहिल्या २५ ई-बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. नवीन वर्षातील सहा महिन्यात सर्व बस पीएमपी मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका