पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मंगळवारी (दि. १८) वातानुकूलित ई-बसची निविदा प्रक्रिया सुरू केली. गणेशोत्सवाच्या काळात ई-निविदा प्रसिध्द करून प्रशासनाने या प्रक्रियेचा प्रारंभ केला. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत एकुण ५०० इलेक्ट्रिक बस घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५० बसेससाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३५० बस घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये २५ बस नऊ मीटर नॉन बीआरटी व १२५ बस १२ मीटर बीआरटी बसचा समावेश आहे. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट बेसिस (जीसीसी) तत्तावर या बस घेण्याचे नियोजन आहे. याची निविदा मंगळवारी प्रसिध्द करण्यात आली असून दि. ९ आॅक्टोबरपर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. दरम्यान, देशात कोणत्याही शहरात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-बस घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पुणे हे पहिले शहर ठरणार आहे. जानेवारी महिन्यात पहिल्या २५ ई-बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. नवीन वर्षातील सहा महिन्यात सर्व बस पीएमपी मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमपीच्या ई-बसची निविदा प्रसिध्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 20:20 IST
देशात कोणत्याही शहरात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-बस घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पुणे हे पहिले शहर ठरणार आहे.
पीएमपीच्या ई-बसची निविदा प्रसिध्द
ठळक मुद्देस्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत एकुण ५०० इलेक्ट्रिक बस घेतल्या जाणार जानेवारी महिन्यात पहिल्या २५ ई-बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील अशी अपेक्षानवीन वर्षातील सहा महिन्यात सर्व बस पीएमपी मिळणार असल्याची माहिती